मुंबई :  आयपीएलच्या 16 व्या मोसमाची (IPL 2023) जोरात तयारी सुरु आहे. या 16 व्या मोसमासाठी मिनी ऑक्शन (Ipl 2023 Mini Auction) 23 डिसेंबरला कोच्चीत होणार आहे. आता क्रिकेट चाहत्यांना आणि टीम मॅनेजमेंटला मिनी ऑक्शनचे वेध लागलेत. बीसीसीआयने (Bcci) प्रत्येक फ्रँचायजीला रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी 15 नोव्हेंबरपर्यंत द्यावीत, असं सांगितलेलं. मीडिया रिपोर्टनुसार, मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या संघांनी बीसीसीायला रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी पाठवली आहे. (ipl 2023 mi csk mumbai indians and chennai has submitted retain and release players list to bcci) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नियमांनुसार, ऑक्शनच्या काही दिवसांआधी प्रत्येक फ्रँचायजीला टीममध्ये कायम ठेवण्यात येणाऱ्या आणि करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयला द्यावी लागते. त्यानुसार मुंबई आणि चेन्नईने रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयला सूपुर्द केल्याचं म्हटलं जात आहे. मुंबई फ्रँचायजीने आपल्या टीममधून मोठ्या खेळाडूला रिलीज केल्याचं म्हटलं जातंय. मुंबईने किरॉन पोलार्डला करारमुक्त केलंय, अशी माहिती रिपोर्टनुसार देण्यात आलीय. 


मुंबई इंडियन्स 


मुंबईने एकूण 10 खेळाडूंना रिटेन तर 5 जणांना रिलीज म्हणजेच करारमुक्त केलंय. यानुसार रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, इशान किशन, सूर्यकुमार यादव, डॅनियल सॅम्स, टीम डेव्हिड, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, ट्रिस्टन स्टब्स आणि टिळक वर्माला रिटेन केलंय. तर फॅबियन एलेन, किरॉन पोलार्ड, टायमल मिल्स, मयांक मार्कंडे आणि ऋतिक शौकीनला रिलीज केल्याचं म्हटलं जातंय. 


चेन्नई सुपर किंग्स 


चेन्नईने 9 खेळाडूंना रिटेन आणि 4 जणांना रिलीज केलंय. आयपीएलच्या 16 व्या मोसमासाठी चेन्नईने महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जाडेजा, मोईन अली, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मुकेश चौधरी, ड्वेन प्रिटोरियस आणि  दीपक चाहर यांना रिटेन केलंय. तर ख्रिस जॉर्डन,  एडम मिल्ने, नारायण जगदीशन आणि मिचेल सेंटनेरला रिलीज केलंय.