IPL 2023 : विराट कोहली आणि गौतम गंभीर (Virat Kohli Gautam Gambhir) यांच्यात वादाची ठिणगी पडली, तो दिवस संपला नवा दिवस उजाडला IPL 2023 मध्ये त्यानंतर नवे सामनेही खेळवले गेले. पण, प्रत्यक्षात मात्र हा वाद मिटल्याचं भासत असलं तरीही मुळात तो आणखी धुमसतोय हेच खरं. पुन्हा एकदा निमित्त आणि कारण ठरतोय तो म्हणजे Lucknow Super Giants (LSG) चा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई विरुद्ध बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यानंतर थेट लखनऊच्या संघातील खेळाडूची का चर्चा होतेय? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, तर या प्रश्नाचं उत्तर आहे 'तो'च वाद. हो, गंभीर आणि विराटमध्ये झालेला तो वाद. 


आयपीएलच्या मैदानात खेळाडू एकमेकांसमोर उभे ठाकतात, त्यांच्यात खटकेही उडतात. पण, हे मतभेद कुठवर न्यायचे हे मात्र त्यांच्याच हातात असतं. लखनऊच्या संघातील Naveen-ul-Haq मात्र सध्यातरी वाद मिटवण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. त्यानं MI vs RCB च्या सामन्यादरम्यान शेअर केलेल्या Insta Post पाहून याचा स्पष्टपणे अंदाज येत आहे. 


विराटवर नवीनचा रोष? 


मुंबईविरोधातील सामन्यात फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या विराटला पहिल्याच षटकात तंबूत परतावं लागलं. त्यानंतर लगेचच Naveen नं इन्स्टा स्टोरीवर आंब्याचा फोटो पोस्ट केला. जिथं हॉटेलरुममधील टीव्हीवर सामना सुरु असल्याचं स्पष्ट दिसलं. त्याची ही Insta story प्रचंड व्हायरल झाली. बरं, हा भाऊ इतक्यावरच थांबला नाही. कारण, त्यानं पुढं जे काही केलं ते पाहता कोहलीवरच तो अप्रत्यक्ष सूड उगवत होता हे दिसून आलं. 


हेसुद्धा वाचा : MI विरुद्धच्या सामन्यात विराट बाद होताच नवीन-उल-हकची जुनीच कुरापत; पाहा काय केलं  


नवीननं शेअर केलेल्या दुसऱ्या इन्स्टा स्टोरीमध्ये त्यानं अनेक आंब्यांचा फोटो जोडला. सोबत तेच दृश्य.... टीव्ही, मुंबई-बंगळुरू सामना. पण, आता मात्र मुंबईचे फलंदाज इथं बंगळुरूचा पराभव करताना दिसत होते. या स्टोरीसाठी त्यानं कॅप्शन लिहिलं, "Round 2 with these...''. असं लिहित त्यानं खाली आंब्यांचा उल्लेख केला. आता मुद्दा असा, की आंबे फक्त निमित्त होते आणि त्याला नेमकं काय साधायचं होतं ते इतरांच्या लक्षात आलं होतं. 




नवीनं या न त्या कारणानं आता विराटला डिवचताना दिसत आहे. किंबहुना वादाला पुन्हा तोंडच फोडताना दिसत आहे. आता त्याच्या या कृतीवर विराट काही उत्तर देतो की त्याकडे दुर्लक्ष करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.