Jhye Richardson out of IPL 2023 : टीम इंडियाचा (Team India) स्टार गोलंदाज Jasprit Bumrah यापूर्वीच दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. बुमराहच्या रूपाने मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) धक्का बसला आहेच, तर आता अजून एक खेळाडू आयपीएलमधून (IPL 2023) बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. येत्या 31 मार्चपासून आयपीलएलला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा गोलंदाज झे रिचर्डसन (Jhye Richardson) यंदाच्या आयपीएलला मुकण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिचर्डसनला गेल्या काही काळापासून हॅमस्ट्रिंगची समस्या जाणवत होती. यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या सर्जरीनंतर एशेजच्या रेसमधून तो बाहेर पडला आहे. गेल्या आठवड्यात क्लबकडून क्रिकेट खेळताना त्याला दुखापत झाली होती. इतकंच नाही तर सुरुवातीला त्याला बीबीएलमध्येही दुखापतीचा सामना कराला लागला होता. यावेळी त्याला भारत विरूद्धच्या वनडे सिरीजमधून वगळण्यात आलं. 


मुंबई इंडियन्सचं मोठं नुकसान


आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमने त्याला आपल्या ताफ्यात घेतलं होतं. ऑक्शनमध्ये रिचर्डसनवर मुंबईने तब्बल 1.5 कोटी रूपये मोजले होते. बुमराहनंतर रिचर्डसन देखील दुखापतीने आयपीएलला मुकणार असल्याने मुंबई इंडियन्ससाठी हे नुकसानापेक्षा कमी नाही. रिचर्डसन 140KPH च्या वेगाने गोलंदाजी करतो. त्यामुळे मुंबईच्या टीमसाठी तो फायदेशीर ठरला असता. 


रिचर्डसनने दिली स्वतः माहिती


आपल्यावर शस्त्रक्रिया झाली असल्याची माहिती रिचर्डसनने स्वतः ट्विट करून दिली आहे. ट्विटमध्ये रिचर्डसन म्हणतो की, दुखापत हा क्रिकेटचा एक मोठा भाग आहे. निराशाजनक? अगदी बरोबर. पण मी आता अशा स्थितीमध्ये आहे ज्यामध्ये मला ज्या गोष्टींची आवड आहे, ती करू शकतो. एक चांगला खेळाडू होण्यासाठी मी खूप मेहनत घेतोय. एक पाऊल मागे, दोन पाऊल पुढे.



बुमराह आयपीएलमधून बाहेर


गेल्या काही काळापासून भारतीय संघातून बाहेर असणारा बुमराह आता आयपीएलमध्ये खेळणार अशी शक्यता असतानाच यालाही शह देणारी माहिती समोर आली आहे. कारण, त्याच्या खेळण्याची शक्यता धुसर आहे. (IPL 2023) आयपीएलच नव्हे तर, वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी (World Championship) जर भारतीय संघ पात्र ठरला. तर, तिथंही बुमराहची दिसण्याची शक्यता कमीच आहे. 


अपेक्षित वेळेत बुमराह दुखापतीतून न सावरणं सध्या मुंबई आणि भारत अशा दोन्ही संघांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. मुंबईच्या संघासाठी तर हा मोठा धक्का आहे. सप्टेंबर 2022 पासून बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असल्याचं पाहायला मिळालं आहे. पाठीत असणाऱ्या स्ट्रेस फ्रॅक्चरच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरून मैदानावर परतण्यासाठी त्याला आणखी बराच वेळ लागू शकतो