Akash Madhwal Life Story: 'आज अक्कूचे वडिले असते तर मुलाचं यश पाहून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला असता. अक्कूने खूप मोठं व्हावं असं त्याच्या वडिलांचं स्वप्न होतं, आज ते स्वप्न प्रत्यक्षात उतरलंय पण ते पाहिला त्याचे वडिल नाहीत' हे शब्द आहेत आकाश मधवालच्या (Akash Madhwal) आईचे. मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) विजयाचा हिरो ठरलेल्या आकाशला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला आणि त्याच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रु तरळले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आई आशा मधवाल आणि मोठा भाऊ आशीष असं आकाश मधवालचं कुटुंब आहे. मुलाच्या यशाचं सुख आण पती नसल्याचं दु:ख आकाशच्या आईच्या चेहऱ्यावर दिसत होतं. प्रत्येक सामना संपल्यानंतर आकाश आवर्जुन आपल्या आईला फोन करतो. लखनऊविरुद्धच्या (Lucknow Super Giants) महत्त्वाच्या सामन्यानंतरही आकाशने आईला फोन करुन आपल्या कामगिरीची माहिती दिली. याशिवाय त्याने रात्री दोन वाजता अहमदाबाचं फ्लाईट असल्याचंही त्याने आईला सांगितलं.


कोण आहे आकश मधवाल
आकाश मधवालने रुडकीमधून सिव्हिल इंजिनिअरिंग केलं. त्यानंतर बहादराबाद ब्लॉक इथं त्याने 2016 ते 2918 अशी दोन वर्षा JE ची नोकरी केली. आकाशची कहाणी भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोणीशी (MS Dhoni) मिळतीजुळती आहे. धोणीने दोन वर्ष तिकिट तपासणीची नोकरी केली त्यानंतर क्रिकेटमध्ये आला. तशीच कहाणी मधवालचीसुद्धा आहे. लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असलेल्या मधवालचं मन नोकरीत रमत नव्हतं त्याने उत्तराखंडच्या संघासाठी चाचणी दिली आणि त्यात तो निवडला गेला.


उत्तराखंडचं मधवाल कुटुंब
29 वर्षांच्या आकाशचं कुटुंब हे मुळचं उत्तराखंडमधल्या रामनगर इथं राहाणारं आहे. आकाशचं सर्व शिक्षण हे रुडकीच्या आर्मी शाळेत झालं. 2012 मध्ये आकाशच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. आकाशचे वडिल भारतीय सेनेच्या बंगाल इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये (Bengal Engineer Group) काम करत होते. मेरठमध्ये तैनात असताना कामादरम्यानच त्यांना हार्टअटॅक आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. त्यानंतर वडिलांच्या पेंशनवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु होता. 


आकाश क्रिकेटकडे कसा वळला
आकाशला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. 2013 मध्ये त्याने रुडकीतल्या COER कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि इथेच त्याच्या क्रिकेटला खऱ्या अर्थाने नवा मार्ग सापडला. 2018 मध्ये उत्तराखंड क्रिकेट असोसिशनला मान्यता मिळाल्यानंतर आकाशने चाचणी दिली आणि यात त्याची निवडही झाली. 


कोच आणि डेल स्टेन आदर्श
आकाश मधवालच्या यशात त्याचे प्रशिक्षक अवतार सिंह यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी आकाशला खूप पाठिंबा दिला. तर गोलंदाजीत दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनला तो आदर्श मानतो. रोहित शर्माने मुंबईतून खेळण्याची संधी दिली आणि आज त्याने या संधीचं सोनं करुन दाखवलं.


आता लक्ष्य टीम इंडिया
आकाश मधवाल 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर मुंबई इंडियन्स संघात सहभागी झाला आहे. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर आता आकाशचं लक्ष्य आहे ते टीम इंडियाची ब्ल्यू जर्सी परिधान करण्याची