IPL 2023: नियम म्हणजे नियम! विराट- गौतमला स्वप्नातही विचार केला नसेल इतकी `गंभीर` शिक्षा
Gautam Gambhir Virat Kohli fined : चुकीला माफी नाही... मग ते कोणीही असो! विराट आणि गौतम गंभीरमध्ये झालेल्या वादानंतर या दोघांनाही मोठी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Gautam Gambhir Virat Kohli fined : आयपीएलचं यंदाचं वर्ष हे खेळाडूंपेक्षा त्यांच्यामध्ये असणाऱ्या वादामुळं क्रिकेटप्रेमींच्या नजरा वळवताना दिसत आहे. यातच आतापर्यंतचा आयपीएलमधील सर्वात मोठा वादही सर्वांनी नुकताच पाहिला. गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यामध्ये लखनऊ येथील अटल बिहारी वाजपेयी स्टेडियममध्ये वादाची ठिणगी पडली आणि आता या दोन्ही खेळाडूंवर IPL Governing Council कडून कठोर कारवाई करण्यात आली आहे.
सोमवारी पार पडलेल्या सामन्यानंतर Lucknow Super Giants चा मेंटॉर असणाऱ्या गंभीर आणि Royal Challengers Bangalore चा फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू असणाऱ्या विराट कोहली चांगलेच अडचणीच आले. त्यांच्यावर सामन्यादरम्यान असणाऱ्या Code of Conduct चं उल्लंघन केल्यामुळं त्यांच्यावर हा कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
हेसुद्धा वाचा : IPL 2023: गौतम गंभीरच्या 'त्या' एका कृतीवर विराटनं उगवला सूड, दोघंही मैदानातच का भिडले? अखेर कारण समोर
वादामुळं प्रकाशझोतात आलेल्या विराट आणि गंभीरच्या मॅच फीमध्ये 100 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. थोडक्यात दोन्ही खेळाडूंना मोठा दणका देत या सामन्यातून त्यांना कोणतंही मानधन मिळणार नसल्याचं आता स्पष्ट होत आहे. इतकंच नव्हे तर, काइल मेयर्सलाही याचा फटका बसला असून, त्याला चुकीसाठी 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. या साऱ्यामध्ये अफगाणिस्तानचा गोलंदाज नवीन उल हक जो या वादार कारणीभूत ठरला त्याच्यावर मात्र कारवाई करण्यात आली नसल्यामुळं या कारवाईवरही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
IPL आयोजकांचं म्हणणं काय?
सदर प्रकरणी आयपीएलच्या ( आयोजकांनी चार वेगवेगळी पत्रकं जारी करत विराट आणि गंभीरला शिक्षा सुनावली. ज्यामध्ये त्यांच्यावर Code of Conduct Level 2.21 चं उल्लंघन करण्यासाठी दोषी मानलं गेलं. इतकंच नव्हे, तर त्या दोघांनीही झाली चूक स्वीकारत एक पाऊल मागे येण्याचा निर्णय घेतला.
वादाच्या कारणाशी पोहोचताना...
विराट आणि नवीन उल हक यांच्यात सामन्यानंतर हात मिळवण्यादरम्यान वाद झाला आणि नंतर त्याला गंभीर वळण मिळालं. हात मिळवण्याच्या वेळी नवीन उल हक विराटला उद्देशून काहीतरी म्हणाला आणि प्रकरण पेटलं. पुढे हा वाद शमला आणि लखनऊचा सलामी फलंदाज काइल मेयर्स विराटसोबत दिसला. त्या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरु असतानाच अखेर गंबीर तिथं आला आणि काईलला त्यानं बाजूला केलं. पुढे भारतीय संघातील या आजी-माजी खेळाडूंमध्येच वाद विकोपास गेला आणि मैदानात खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटला वेगळंच रुप मिळालं. क्रिकेटच्या मैदानात झालेला हा प्रकार खेळाची प्रतिमा मलिन करणारा असल्यामुळं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.