IPL 2023: गौतम गंभीरच्या `त्या` एका कृतीवर विराटनं उगवला सूड, दोघंही मैदानातच का भिडले? अखेर कारण समोर
Gautam Gambhir Vs Virat Kohli in IPL 2023 at Lucknow: भारतीय संघात एकत्र खेळूनही विराट आणि गौतम यांच्यात असणारं वैर कोणापासूनही लपलेलं नाही. किंबहुना त्यांच्यातील वाद चव्हाट्यावर येईल याची कल्पनाही कोणी केली नसावी.
Gautam Gambhir Vs Virat Kohli in IPL 2023 at Lucknow: जिथं स्वभावांची टक्कर होते तिथं वाद होणारच. पण, जिथं काही वृत्ती आमनेसामने येतात तिथं मात्र वादाचं रुपांतर आणखी गंभीर निष्कर्षांमध्ये होताना दिसतं. आयपीएलच्या नुकत्याच पार पडलेल्या सामन्यात असंच काहीसं झालं. या सामन्यात भारतीय संघातील माजी खेळाडू (Gautam Gambhir) गौतम गंभीर आणि आरसीबी अर्थात बंगळुरूच्या संघाकडून खेळणारा खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) यांच्यात धुमसणाऱ्या ठिकणगीचा अखेर वणवा पेटला आणि भर मैदाना हा वाद विकोपास गेला.
एका संघात खेळूनही विराट आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये असणारा वाद कोणापासूनही लपलेला नव्हता. लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या सामन्यात या वादानं शिखर गाठलं. जिथं, आरसीबीनं लखनऊला 18 धावांनी नमवलं.
...आणि काही कळायच्या आतच वाद पेटला
सामना संपला, बंगळुरूच्या संघानं लखनऊवर विजय मिळवला आणि त्यानंतरच्या औपचारिकतेसाठी खेळाही एकमेकांना हात मिळवताना दिसले. त्याचवेळी विराट आणि गंभीरमध्ये काही कारणानं धुसफूस झाली. दोन्ही संघाचे खेळाडू तिथं विराट आणि गंभीरला एकमेकांपासून दूर लोटण्याचा प्रयत्न करत होते. पण, त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला. गंभीरनं विराटच्या दिशेनं येत त्याला डिवचलं आणि हा वाद आणखी पेटला. तितक्यात तिथं अमित मिश्रा आणि विजय दहिया यांनी येत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.
विराटनं खरंच सूड उगवला?
आकर्षक बाब म्हणजे आयपीएलच्या 15 व्या पर्वामध्ये लखनऊच्या संघानं बंगळुरूमध्ये जात अटीतटीच्या सामन्यात बंगळुरूला नमवलं होतं. घरच्याच मैदानावर सामना असल्यामुळं बंगळुरूच्या चाहत्यांनी चिन्नस्वामी स्टेडियममध्ये एकच कल्ला केला होता. ज्यानंतर लखनऊनं बंगळुरूला हरवलं त्या क्षणी गंभीरनं मैदानातच हाताची घडी तोंडावर बोट असाच इशारा तिथं असणाऱ्या क्रिकेटप्रेमींना संबोधून केला. बस्स, याच कृतीचा सूड म्हणे विराटनं सोमवारच्या सामन्यात उगवला.
हेसुद्धा वाचा : Rohit Sharma ला आऊट करण्यासाठी संजूने चिटींग केली? BCCI चं व्हिडीओद्वारे स्पष्टीकरण
लखनऊला नमवल्यानंतर विराटनं प्रेक्षकांच्या समोर उभं राहत गर्वानं एक इशारा केला. इतक्यावरच न थांबता सर्वांना शांत राहण्याचा इशाराही केला. त्याच्या याच कृतीनं गौतम आणखी 'गंभीर' झाला आणि मैदानात आला. आणि त्यानंतर पुढे नेमकं काय झालं हे सर्वांनीच पाहिलं.