IPL 2023 : तो रक्तबंबाळ झाला तरीही खेळला; मिशेल सँटनरच्या जिद्दीपुढं भलेभले झुकले
IPL 2023 : आयपीएलमध्ये दर दिवशी एक खेळाडू चमकून जातो. अशाच खेळाडूंच्या यादीत आता नव्यानं आलेलं नाव म्हणजे मिशेल सँटनर. मैदानात रक्तबंबाळ होऊनही हा पठ्ठ्या खेळत राहिला.... मुंबईच्या संघाच्या नाकीनऊ आणत राहिला.
IPL 2023 : काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या (IPL) आयपीएलला आता चांगलीच रंगत येताना दिसत आहे. कुठं एखादा खेळाडू दमदार खेळीनं क्रिकेटप्रेमींची मनं जिंकत आहे, तर कुठे कुणी जिद्दीच्या बळावर संघाचा विश्वास जिंकताना दिसत आहे. सध्या याच जिद्दीमुळं (CSK) चेन्नई सुपरकिंग्स या संघातील एक खेळाडू सर्वांच्या कौतुकास पात्र ठरत आहे. हा खेळाडू म्हणजे मिशेल सँटनर.
आयपीएलमध्ये चार वेळी जेतेपद मिळवणाऱ्या चेन्नईच्या संघाला यंदाच्या म्हणजेच स्पर्धेच्या 16 व्या पर्वामध्ये दमदार सुरुवात करण्याची संधी मिळाली आहे. नुकत्याच (Mumbai Indians) मुंबईविरोधात खेळवल्या गेलेल्या सामन्यात या चेन्नईनं बाडी मारली. यामध्ये संघातील फिरकी गोलंदाजांनी मोलाची भूमिका बजावल्याचं पाहायला मिळालं. या सामन्यात रविंद्र जडेजानं तीन आणि मिशेल सँटनगरनं दोन गडी बाद केले.
सँटनरनं (Mitchell Santner) त्याच्या गोलंदाजीनं क्रिकेटप्रेमींची मनं जिंकली, पण त्याच्या आणखी एका वृत्तीनं सर्वांनीच त्याचं कौतुकही केलं. सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या एका फोटोमधून मैदानात नेमकं काय घडलं, याचा अंदाज अगदी सहजपणे लावता येत आहे.
हेसुद्धा वाचा : Rinku Singh: रिंकूचा पराक्रम पाहून Shreyas Iyer चा आनंद गगनात मावेना; थेट Video Call केला अन्...
चेन्नई सुपरकिंग्सच्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये सँटनरच्या गुडघ्यापाशी कसलेसे डाग दिसत आहेत. हे डाग नसून, त्याच्याच्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळं होणाऱ्या रक्तस्त्रावाचे होते. एकिकडे दुखापतीनं वेदना होत असल्या तरीही त्यावर मात कन सँटनगर संघासाठी आणि कर्णधार धोनीनं आपल्यावर ठेवलेल्या विश्वासापोटी मैदानावर मोठ्या धीरानं उभा राहिला आणि त्यानं सूर्यकुमार यादव, अरशद खान यांना तंबूत माघारी पाठवलं.
सँटनरमुळे आठवले वॉटसन आणि डुप्लेसिस
मिशेल सँटनरच्या या दमदार प्रदर्शनामुळं शेन वॉटसन आणि फाफ डुप्लेसिस यांनीही असंच काहीसं केल्याची आठवण क्रिकेटप्रेमींना झाला. आयपीएलच्या 12 व्या पर्वामध्ये वॉटसननंही मुंबईविरुद्ध खेळताना दुखापत होऊनही मैदानावर दमदार खेळीचं प्रदर्शन करत चेन्नईच्या संघाला विजय मिळवून दिला होता. तर, डुप्लेसिसनंही 2021 मध्ये केकेआरविरुद्ध सामना खेळत असताना गुडघ्याच्या दुखापतीकडे दुर्लक्ष करत अप्रतिम Fielding केल्याचं पाहायला मिळालं होतं.