IPL 2023: मुंबई इंडियन्स आत की बाहेर, आता एकच गोष्ट त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवून देऊ शकते ?
IPL 2023 : आयपीएलमध्ये मोठी चुसर निर्माण झाली आहे. मात्र, मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळणार की नाही, याची मोठी उत्सुकता आहे. IPL 2023 मधील प्लेऑफची सामने अतिशय रोमांचक टप्प्यावर आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करुन प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता मुंबईचे काय होणार, याचीच उत्सुकता आहे.
Mumbai Indians : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स राहणार की बाहेर जाणार याचीच धागधुग वाढली आहे. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. मुंबई इंडियन्सचा आयपीएल लीगमधील आज शेवटचा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. या सामन्यावर पुढे प्लेऑफमध्ये खेळण्याचे दरवाजे उघडणार आहेत. आयपीएलला सुरुवात झाली आणि सुरुवात मुंबई इंडियन्ससाठी खराब होती, परंतु त्यानंतर मुंबई टीमने कामगिरीत सुधारणा केली आणि संघाने एकामागून एक सामने जिंकले. मात्र, संघाला त्यांच्या शेवटच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते, त्यामुळे आता संघाला प्लेऑफच्या शर्यतीत जाण्यात अडचणी येत आहेत. जर मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचे असेल तर एकच गोष्ट या संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवून देऊ शकते.
राजस्थानने सामना जिंकल्याने आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये 5 स्थान पटकावले आहे. यामुळे मुंबई इंडियन्स पॉईंट्स टेबलमध्ये 6 व्या क्रमांकावर खाली घसरली असून त्यांचा प्लेऑफ गाठण्याचा मार्ग खडतर मानला जात आहे. मात्र, प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा अद्याप कायम आहेत. सर्वकाही हे आरसीबी टीमवर अबलंबून आहे.
प्लेऑफमध्ये जाण्यासाठी फक्त एकच मार्ग शिल्लक!
मुंबई इंडियन्सचा लीग टप्प्यातील शेवटचा सामना आज रविवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आहे. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी मुंबईला या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. या सामन्यात मुंबईची टीम पराभूत झाली तर त्यांनी पॅकिंग करावे लागेल. दरम्यान, मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी विजय पुरेसा ठरणार नाही. कारण प्लेऑफच्या मार्गावर टीमसमोर आणखी एक समस्या आहे.
RCB मुंबई इंडियन्सची डोकेदुखी वाढवू शकते...
मुंबई इंडियन्सने हैदराबादविरुद्धचा सामना जिंकला तरी त्यांना आरसीबीच्या पराभवाची वाट पाहावी लागणार आहे. आरसीबी हरला तरच मुंबई प्लेऑफसाठी पात्र ठरु शकेल, मात्र आरसीबीने हा सामना जिंकला तर मुंबईचे प्लेऑफमध्ये जाण्याचे स्वप्न भंगणार होईल आणि टीम स्पर्धेतून बाहेर पडेल. आरसीबीला शेवटचा साखळी सामना गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे आणि याच सामन्यावर सर्वकाही अबलंबून आहे.
दोन्ही टीमचे सम-समान गुण
आरसीबी आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही टीमचे आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये 14-14 गुण आहेत आणि दोघांना शेवटचा एक सामना खेळायचा आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांना विजय मिळवणे क्रमप्राप्त आहे. त्यानंतर त्यांचा प्लेऑफमधील प्रवेश निश्चित आहे. मुंबई इंडियन्स ही आयपीएलची सर्वात यशस्वी टीम मानली जाते. या टीमने पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला आपल्या पहिल्या आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.