IPL 2023, RR vs DC Live Score: आयपीएलच्या 11 व्या सामन्यात राजस्थानचे रजवाडे दिल्लीच्या धुरंदरांशी भिडणार आहेत. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स (Rajasthan Royals) इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) मधील त्यांचं खातं उघडण्याचा प्रयत्न करतील. तर मागील सामन्यात झालेला पराभव पचवून दिल्लीचं (Delhi Capitals) पानीपत करण्यासाठी संजूची सेना तयार असणार आहे. आजच्या मैदानावर राजस्थानला पंजाब किंग्जविरुद्ध (RR vs DC) 5 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. (IPL 2023 Rajasthan Royals vs Delhi Capitals11th Match read who will win match)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीला पृथ्वी शॉ आणि सरफराज खान यांच्याकडून खास कामगिरीची अपेक्षा आहे. मागील हंगामात जॉस बटलरच्या शतकाच्या जोरावर राजस्थानने दिल्ली विरुद्धचा पहिला सामना जिंकला. दिल्ली राजस्थान दोन्ही संघांचा 50-50 असा अचूक विक्रम आहे. दोघांनी एकमेकांविरुद्ध 13 सामने जिंकले आहेत. त्यामुळे यावेळी देखील दोन्ही संघाचं पारडं समान असणार आहे.


कसा असेल राजस्थानचा संघ? Rajasthan Royals (Playing XI):


जॉस बटलर, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (w/c), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल


कसा असेल दिल्लीचा संघ? Delhi Capitals (Playing XI):


डेव्हिड वॉर्नर (C), मनीष पांडे, रिली रॉसौ, रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल (WC), एनरिक नोर्टजे, खलील अहमद, कुलदीप यादव, मुकेश कुमार



दरम्यान, उच्च स्कोअरिंग सामना (Rajasthan Royals vs Delhi Capitals) होण्याची शक्यता आहे. दोन्ही सामने गमावलेल्या कॅपिटल्सवर अतिरिक्त दबाव असेल तर रॉयल्स त्याच ठिकाणी पंजाब किंग्जला कमी पराभवानंतर परतण्यास उत्सुक असणार आहे.