Why Virat Kohli Sold His Cars: इंडियन प्रमियर लीगचं (IPL 2023) म्हणजेच IPL चं 16 वं पर्व उद्यापासून म्हणजेच 31 मार्चपासून सुरु होत आहे. या पर्वामधील पहिलाच रविवार हा सुपर सण्डे असणार आहे कारण या दिवशी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या सामन्यामध्ये पुन्हा लय गवसलेला विराट कोहली (Virat Kohli) कसा खेळतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असणार यात शंका नाही. आयपीएलच्या इतिहासामध्ये एकदाही चषक न जिंकलेल्या संघांमध्ये विराट खेळत असलेल्या आरसीबीचा समावेश होते. अर्थात कोहलीची आयपीएलमधील कामगिरी दमदार आहे. असं असलं तरी सांघिक यशाबद्दल बोलल्या आरसीबीचं अपयश स्पष्टपणे दिसून येतं. मात्र यंदा आरसीबी दमदार कमागिरी करेल आणि त्यातही विराटची धडाकेबाज फलंदाजी पाहायला मिळेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. 


विराटने विकल्या कार्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्व संघांचा सराव सुरु झाला असून सोशल मीडिया अकाऊंटही सक्रीय झाले आहेत. अनेक खेळाडूंच्या गप्पा, सरावादरम्यानचे फोटो आणि किस्से सोशल मीडियावरुन शेअर केले जात आहेत. असं असतानाच आरसीबीनेही विराट कोहलीबरोबर केलेल्या एका चर्चेमध्ये तिला काही रंजक प्रश्न विचारले. या चर्चेदरम्यान विराटने त्याच्याकडी आलिशान गाड्या विकल्याची माहिती दिली. तसेच या गाड्या अशा अचानक का विकल्या याबद्दलही त्याने सांगितलं.


विराटने सांगितलं अचानक कार्स विकण्याचं कारण


विराटला त्याच्या शॉपिंग हॅबीट म्हणजेच गोष्टी खरेदी करण्यासंदर्भातील सवयींबद्दल विचारण्यात आलं. फार विचार न करता तू खरेदी केलीय आणि नंतर त्या गोष्टींचा फारच कमी वापर केलाय असं झालं आहे का तुझ्यासोबत कधी? असं विराटला विचारण्यात आलं असता त्याने त्याच्याकडी आलिशान कार्सबद्दल सांगितलं. "माझ्याकडे अनेक अशा कार्स होत्या ज्या मी फार विचार करुन खरेदी केल्या नव्हत्या. मी फारच क्वचित त्या चालवायचो. त्यापैकी अनेक गाड्यांमधून तर मी कधी प्रवासही केला नाही. एका वेळी मला वाटलं की हे (एवढ्या कार्स असणं) फारच व्यर्थ गोष्ट आहे. त्यामुळे मी त्यापैकी अनेक कार विकल्या. आता आम्ही तिच कार वापरतो जिची आम्हाला गरज आहे. मला वाटतं ही हे आपण वयाने मोठं झाल्याचं आणि गोष्टींबद्दल अधिक जागृक झाल्याचं दर्शवतं. आपण अधिक परिपक्व होत असल्याचे हे संकेत वाटतात. आपल्याला जसं मोठं झाल्यानंतर खेळण्यांच आकर्षण राहत नाही तसाच हा प्रकार आहे. आपण व्यवहारिक झाल्याचं आणि उपयोगाच्याच गोष्टी ठेवाव्यात हे यातून दिसून येतं," असं विराटने गाड्यांबद्दल सांगितलं.



मागील काही समान्यामध्ये विराटने दमदार कामगिरी केली असल्याने त्याला गवसलेला हाच फॉर्म आयपीएलमध्येही पाहता येईल अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. आता आयपीएलमध्ये काय होतं हे येणारा काळच सांगेल.