धक्कादायक| टीम इंडियाच्या या खेळाडूचा वर्ल्ड कप आधी संघाला रामराम?
`तुझा हा प्रवास संस्मरणीय ठरला. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा`,
मुंबई : गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) आयपीएल 2022 चे विजेतेपद (Ipl 2022) पटकावले. शुबमन गिलने (Shubman Gill) IPL 2022 मध्ये गुजरात टायटन्ससाठी अप्रतिम खेळ दाखवला. गुजरातला ट्रॉफी मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आता गुजरात टायटन्स फ्रँचायझीने ट्विटरवर एक ट्विट केलंय. ज्यामुळे शुभमन गिल गुजरात टायटन्सपासून वेगळे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचवेळी शुभमन गिल आणखी एका आयपीएल संघात सामील होण्याचे संकेत मिळत आहेत. (ipl 2023 team india and gujrat titans star batter shubaman gill may quit team and join kkr squad discussion on social media twitter)
Gujarat Titans चं ट्वीट
"तुझा हा प्रवास संस्मरणीय ठरला. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा", असं ट्विट गुजरात टायटन्सने त्यांच्या अधिकृत हँडलवर केलंय. या ट्विटमुळे अनेक चर्चांना उधाण आलंय. शुबमनने या ट्विटवर हार्ट इमोजी कमेंट केलीय. गिलला गुजरात संघाने IPL 2022 मध्ये 8 कोटी रुपयांमध्ये सामील केलं होतं.
शुबमन सध्या धमाकेदार कामगिरी करतोय. शुबमनने आयपीएल 2022 च्या 16 सामन्यांमध्ये 483 धावा केल्या होत्या. त्याने गुजरात टायटन्ससाठी अनेक सामने स्वबळावर जिंकून दिले. गुजरातला पहिल्यांदा चॅम्पियन बनवण्यात शुबमनने महत्त्वाची भूमिका बजावली. यापूर्वी शुबमन गिलने कोलकाता नाईट रायडर्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. गिलने IPL 2022 च्या 74 सामन्यांमध्ये 32 च्या सरासरीने 1 हजार 900 धावा केल्या आहेत.
शुबमन आयपीएलमध्ये या टीमकडून खेळणार?
केकेआर संघाने शुभमन गिलच्या ट्विटवर कमेंट केलीय. त्यामुळे आता शुबमन केकेआरमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शुबमन त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. त्याने वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर अप्रतिम खेळ दाखवला. या कामगिरीच्या जोरावर त्याने 'प्लेअर ऑफ द सीरिजचा' पुरस्कारही जिंकला. गिलने भारतासाठी 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये 499 धावा आणि 11 कसोटी सामन्यात 579 धावा केल्या आहेत.

Welcome back, @ShubmanGill

It was always meant to be https://t.co/TtxhEkcTtl
— KolkataKnightRiders (@kkriders__) September 17, 2022