IPL 2023: मैदानात सामना सुरु असतानाच चाहत्यांचा तुफान राडा; VIDEO व्हायरल
IPL 2023: दिल्लीमध्ये मैदानात सामना सुरु असताना काही प्रेक्षकांमध्ये तुफान हाणामारी झाली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) होत आहे.
IPL 2023: क्रिकेट चाहत्यांमध्ये सध्या आयपीएलमुळे (IPL) प्रचंड उत्साह आहे. जसजसे सामने पार पडत आहेत, त्याप्रमाणे कोणते संघ अंतिम फेरी गाठतील याची उत्सुकता वाढत चालली आहे. यामुळेच आयपीएलच्या सर्व सामन्यांसाठी प्रेक्षक तुडुंब गर्दी करत आहेत. सामना पाहायला आल्यानंतर आपल्या संघाला पाठिंबा देताना चाहते अनेकदा दुसऱ्या संघाच्या चाहत्यांना डिवचत असतात. त्यातूनच अनेकदा त्यांच्यात वादावादीदेखील होते. दरम्यान असाच काहीसा प्रकार दिल्लीमधील सामन्यादरम्यान घडल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. आयपीएलमध्ये नुकताच दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना पार पडला. हा सामना पाहण्यासाठी मैदान नेहमीप्रमाणे गर्दीने खचाखच भरलेलं होतं. यादरम्यान प्रेक्षकांमधील दोन गटांत अचानक राडा सुरु झाला. व्हिडीओत दोन्ही बाजूचे एकमेकांना बेदम मारहाण करताना दिसत आहेत. यावेळी इतर प्रेक्षक हा सर्व प्रकार पाहत उभे होते. दरम्यान या भांडणाचं नेमकं कारण काय होतं हे अद्याप समजू शकलेलं नाही. पण हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
हैदराबादमधील सामन्यात पुन्हा एकदा दिल्लीचा 9 धावांनी पराभव झाला. यासह दिल्ली संघ गुणतालिकेत अखेरच्या स्थानी पोहोचला आहे. या सामन्यात मिशेल मार्शने अष्टपैलू कामगिरी केली. मात्र सनरायजर्स हैदराबादने हा सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या या अष्टपैलू खेळाडूने गोलंदाजी करत चार गडी बाद केले. नंतर फलंदाजी करत 39 चेंडूत 63 धावा ठोकल्या. पण तो बाद झाल्यानंतर दिल्ली संघ सावरु शकला नाही आणि सामना हैदराबादच्या पारड्यात गेला.
हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 6 गडी गमावत 197 धावा केल्या. अभिषेक शर्माने 36 चेंडूत 63 धावा करत संघाला एक मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केली. दिल्लीला 36 चेंडूत 69 धावांची गरज असताना हैदराबादच्या गोलंदाजांनी त्यांना अडवलं. दिल्ली 20 ओव्हरमध्ये 188 धावा करु शकला. अक्षर पटेलने यावेळी 14 चेंडूत 29 धावा ठोकल्या.
डेव्हिड वॉर्नरने अक्षर पटेलला फलंदाजीला 7 व्या क्रमांकावर पाठवलं होतं. यामुळेच नंतर त्याच्यावर टीका होऊ लागली. अक्षय चांगल्या लयीत आहे. अखेऱच्या क्षणांचा डावखुरा फलंदाज महत्त्वाचा ठरु शकतो असं आम्हाला वाटलं होतं. आमच्याकडे फक्त मी आणि अक्षरच होते. अक्षरला रोखून ठेवणं कठीण आहे. पण त्याक्षणी काही आव्हानं असतात. कदाचित पुढील वेळी आम्ही त्याला लवकर पाठवण्याचा विचार करु असं वॉर्नरने सामना संपल्यानंतर सांगितलं. दरम्यान या विजयासह हैदराबादने आयपीएलमधील आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. सहा गुणांसह ते आठव्या स्थानी आहेत. तर दिल्ली एकदम शेवटी आहे.