IPL 2023: प्रयत्नांती परमेश्वर... हे ब्रीद आपण शालेय जीवनापासूनच ऐकलं. अनेकदा त्याची प्रचीतीही आली. पण, सध्या सुरु असणाऱ्या आयपीएलमध्ये बंगळुरूच्या संघातून खेळणाऱ्या विराट कोहलीच्या बाबतीत मात्र याउलटच गोष्टी घडताना दिसत आहेत. विराटकडे संघाचं कर्णधारपद असताना आणि नसतानाही संघ काही जेतेपदाचं स्वप्न साकार करू शकलेला नाही. किंबहुना यंदाच्या वर्षीही विराटनं मोठ्या जबाबदारीनं खेळाचं प्रदर्शन केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच पार पडलेल्या सामन्यात त्यानं शतकी खेळीही केली. गुजरातविरुद्धच्या सामन्यात विराटनं शतक झळकावत त्याच्या आयपीएल कारकीर्दीतील शकतांच्या यादीच सातव्या सेंच्युरीची भर टाकली. विराटचे  (Virat Kohli) हे प्रयत्न अनेकांचीच दाद मिळवून गेले. पत्नी अनुष्काच्या आणि चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणून गेले. पण, संघाला आयपीएलच्या जेतेपदानजीक मात्र नेऊ शकले नाहीत. 


शुमभन गिलच्या शतकी खेळीनं विखुरली स्वप्न 


आरसीबीचं आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आल्यामुळं आता (Mumbai Indians, Chennai Super kings) मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपरकिंग्स, लखनऊ सुपर जाएंट्स आणि गुजरात टायटन्स या संघांनी जेतेपदाच्या दिशेनं पावलं टाकली आहेत. असं असलं तरीही आरसीबीसाठी विराटनं रविवारी केलेल्या खेळीकडे दुर्लक्ष करताच येणार नाही. (IPL 2023 Virat Kohlis crying photo Goes Viral After Shubman Gills Century as it ends rcbs Hopes)


विराटनं या सामन्यात 61 चेंडूंमध्ये 13 चौकार आणि 3 षटकार ठोकत 101 धावा केल्या. पण, तिथं विरोधी संघातून खेळणाऱ्या (Shubhman Gill) शुभमन गिलनं 52 चेंडूंमध्ये 104 धावा ठोकल्या आणि त्याच्या स्वप्नांचा बंगला कोलमडला. कितीही नाकारलं तरी विराटच्या जिव्हाली ही बाब लागली आणि नकळतच त्याचे डोळे पाणावले. प्रयत्न करूनही संघाला शेवटच्या टप्प्यापर्यंत नेता न आल्याचं दु:ख त्याच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत होतं. सोशल मीडियावर त्याचा पाणावलेल्या डोळ्यांसह निराश चेहऱ्याचा एक फोटो प्रचंड व्हायरल झाला जे पाहून चाहत्यांच्याही मनात कालवाकालव झाली. 




विराटच्या नावे विक्रमाची नोंद... 


विराटनं आतापर्यंत आयपीएलच्या कारकिर्दीत सर्वाधित शतकी खेळींची नोंद करत क्रिस गेलचा विक्रम मोडला आहे. या खेळाबाबत बोलताना त्यानं आपण पुन्हा एकदा T20 मध्ये चांगल्या खेळाचं प्रदर्शन करत असल्याची बाब अधोरेखित केली. 


'मला छान वाटतंय. अनेकांच्या मते माझा टी20 चा फॉर्म ढासळतोय. पण, मला तसं मुळीच वाटत नाहीये. कारण, मला असं वाटतंय की टी20 मध्ये मी पुन्हा उत्तम कामगिरी करु लागलो आहे. मी फक्त माझ्या खेळण्याचा आनंद लुटतोय, ही माझी खेळण्याची शैली आहे', असं तो मिड इनिंग्स ब्रेकमध्ये रवी शास्त्री यांच्याशी संवाद साधताना म्हणाला.