IPL 2023 Final Highlights : पावसाच्या नाराजी नाट्यानंतर अखेर यंदाच्या आयपीएल 2023 ची सांगता झाली. पूर्वनियोजित दिवसाला चेन्नई विरुद्ध गुजरात या संघांमधील अंतिम सामना खेळवला गेला नाही. ज्यानंतर Reserve Day ला हा सामना खेळवला जाणार असल्याचं ठरलं आणि हार्दिकच्या गुजरात संघापुढे थाला धोनीची चेन्नई उभी ठाकली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्यावर पावसाचं सावट कायम होतं, पण अखेर नियम आणि बरीच आकडेमोड करत शेवटच्या क्षणी आखलेले बेत पूर्णत्वास नेत तो क्षण आला. जिथं आयपीएलचं जेतेपद चेन्नई सुपरकिंग्स या संघाच्या नावे करण्यात आलं. शेवटच्या दोन चेंडूंमध्ये डाव असा फिरला की 'आम्हीच विजेते' असा समज झालेल्या हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सला पराभूत व्हावं लागलं. (CSK Vs GT IPL finals 2023)


तो आला आणि... 


सामना झाला, विजेते ठरले, बक्षीस वितरण सोहळाही पार पडला. रात्री दीड वाजेपर्यंत हा सर्व थरार सुरु होता. ज्यानंतर सर्व खेळाडू हॉटेलवर गेले आणि तिथं त्यांचा जल्लोष सुरु झाला. मैदानात आलेल्या क्रिकेटप्रेमींपैकी काहीजण मात्र अद्यापही तिथंच थांबून होते. घड्याळाचा काटा वेगानं धावत होता. साधारण मध्यरात्र उलटून 3.30 वाडले होते. तितक्यातच तिथं चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आला आणि चाहते थक्कच झाले. 


सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमधून ही गोष्ट सर्वांसमोर आली. जिथं सामन्यानंतरही माही मैदानात आल्याचं पाहायला मिळत आहे. तो तिथं आला होता चाहत्यांचे आभार मानण्य़ासाठीय ज्यांच्या पाठिंब्यामुळं आपण इथवर पोहोचलो त्याच चाहत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माही मैदानात आला. त्याला पाहताच क्रिकेटप्रेमींनी जोरजोरात त्याच्या नावानं घोषणा करण्यास सुरुवात केली. खेळपट्टी पावसामुळं झाकलेली असताना त्याचं तिथं येणं आणि कृतज्ञता व्यक्त करणं हे सर्वकाही त्याला पुन्हा एकदा gentleman ठरवून गेलं. 


हेसुद्धा वाचा : IPL 2023 Final Highlights : थाला तूच रेsss; सामना गमावणाऱ्या Gujrat Titans चं माहीसाठी भावनिक ट्विट, हेच खरं स्पोर्ट्समन स्पिरीट 




संघातील खेळाडूंचा बेफाम डान्स 


तिथे माही संपूर्ण संघाच्या वतीनं चाहत्यांचे आभार मानतानाच इथे हॉटेलवर खेळाडूंचा कल्ला सुरु झाला होता. याचाच एक व्हिडीओही व्हायरलझाला जिथं दीपक चाहर हॉटेलमध्ये चक्क भांगडा हा नृत्यप्रकार करताना दिसला. हॉटेलमध्ये वाजणारा ढोल, असिमीत उत्साह आणि अत्यानंद इतकंच काय ते त्या क्षणी पाहायला मिळालं.