IPL 2023: आयपीएलच्या सोळावा हंगामात 35 व्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) गुजरात टायटन्सने  (Gujrat Titans) रोहित शर्माच्या (Rohit Sharma) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) तब्बल 55 धावांनी मोठा पराभव केला. या विजयानंतर गुजरातने पॉईंटटेबलमध्येही (IPL Point Table) मोठी झेप घेतली असून थेट दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. गुजरातच्या दमदार कामगिरीची सध्या चर्चा सुरु आहे, पण त्याचबरोबर आणखी एका गोष्टीसाठी गुजरात टायटन्स चर्चेत आहे. गेल्या काही सामन्यात वेगवान गोलंदाज यश दयाल (Yash Dayal) गुजरात संघात दिसलेला नाही. त्यामुळे यश दयाल कुठे आहे? आणि तो खेळत का नाहीए? असे प्रश्न क्रिकेटप्रेमींकडून विचारले जात आहेत. यावर गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने मोठा खुलास केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक पांड्याने केला खुलासा
कोलकाताविरुद्धच्या सामन्यात एकाच षटकात पाच षटकार खाल्यानंतर गुजरातचा वेगवागन गोलंदाज यश दयाल चर्चेत आला होता. पण त्यानंतर पुढच्या कोणत्याच सामन्यात तो दिसला नाही. यावर प्रतिक्रिया देताना हार्दिक पांड्याने यश दयाल आजारी असल्याचं सांगितलं. कोलकाताविरुद्धच्या सामन्यानंतर यश दयालची प्रकृती बिघडली, त्यामुळे त्याचं तब्बल सात-आठ किलो वजन कमी झाल्याचंही हार्दिकने सांगितलं. 


कोलकाताविरुद्धच्या सामन्यात त्याला दबावाचा सामना करावा लागला होता, सध्या त्याची परिस्थिती काहीशी ठिक नाहीए, त्यामुळे तो मैदानात सध्या उतरु शकत नाही, मैदानात उतरण्यासाठी त्याला काही वेळ लागेल, असं हार्दिकने म्हटलंय. 


शेवटच्या षटकातील चुरस
आयपीएलच्या तेरावा सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स आमने सामने आले होते. हा सामना प्रचंड चुरशीचा झाला. कोलकाताला विजयासाठी शेवटच्या षटकात 29 धावांची गरज होती. कोलकाताचा रिंकू सिंह खेळपट्टीवर होता तर गुजरातकडून शेवटचं षटक टाकण्यासाठी यश दयाल आला. शेवटच्या षटकात इतक्या धावांचं आव्हान जवळपास अशक्यप्राय होतं. गुजरात टायटन्सचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. पण खेळात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकतं हे या सामन्यात पुन्हा एकाद अधोरेखित झालं.


रिंकू सिंहने लगावले 5 सिक्स
रिंकून सिंहने (Rinku Singh) यश दयालच्या एकाच षटकात सलग पाच षटकार खेचत 31 धावा केल्या आणि कोलकाताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. एका षटकात पाच सिक्स खाल्यानंतर यश दया प्रचंड निराश झाला. गुजरातच्या कर्णधारासह सर्वच खेळाडूंनी त्याचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर यश दयाल अंतिम 11 खेळाडूंमध्ये दिसला नाही.


कोण आहे यश दयाल?
यश दयाल डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. आयपीएलचा दुसरा हंगाम तो खेळतोय. डिसेंबर 2022 मध्ये पार पडलेल्या आयपीएलच्या मेगा ऑक्शनध्ये गुजरात टायटन्सने यश दयालवर 3.2 कोटींची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं. यशने पहिल्या हंगामात 9 सामन्यात 11 विकेट घेतल्या होत्या. पण दुसरा हंगाम त्याच्यासाठी आतापर्यंत निराशाजनक ठरलाय. या हंगामात तो एकूण 3 सामने खेळला असून त्याला एकही विकेट घेता आलेली नाही.