MS Dhoni नंतर CSK चा कॅप्टन कोण? अंबाती रायडूने घेतलं `या` खेळाडूचं नाव!
Ambati Rayudu On CSK Captain : महेंद्रसिंग धोनीसाठी यंदाची आयपीएल (IPL 2024) त्याच्या आयुष्यातील शेवटची असू शकते. मात्र, धोनीनंतर (MS Dhoni) सीएसकेचा कॅप्टन कोण? असा सवाल विचारला जातोय. त्यावर अंबाती रायडू याने मोठं वक्तव्य केलंय.
Chennai Super Kings, IPL 2024 : मागील आयपीएल हंगामामध्ये चेन्नई सुपर किंग्जने (CSK) धमाकेदार कामगिरी करत पाचव्यांदा आयपीएलची ट्रॉफी (IPL Trophy) जिंकली होती. महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली चेन्नईने (Chennai Super Kings) मुंबई इंडियन्सच्या रेकॉर्डची बरोबरी केली होती. गेल्या दोन वर्षात चेन्नई सुपर किंग्जमध्ये वेगवेगळे प्रयोग केले गेल्याचं दिसून येतंय. त्यामुळे धोनी यंदाच्या आयपीएलनंतर निवृत्ती (MS Dhoni IPL Retirement) घेणार हे निश्चित झालंय. अशातच आता धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन कोण? असा सवाल विचारला जातोय. त्यावर आता चेन्नई सुपर किंग्जचा माजी फलंदाज अंबाती रायडू (Ambati Rayudu) याने मोठं वक्तव्य केलंय.
काय म्हणाला Ambati Rayudu ?
एमएस धोनीच्या निवृत्तीनंतर ऋतुराज गायकवाड सीएसकेचा पुढचा कर्णधार होऊ शकतो. एमएस धोनीच्या निवृत्तीनंतर सीएसकेचा कर्णधार कोण असेल, असं विचारलं असता अंबाती रायडूने ऋतुराज गायकवाडचे नाव घेतलं. ऋतुराज गायकवाडने अनेक सामन्यात चांगली कामगिरी केली असून तो टीम इंडियाचं भविष्य असल्याचं अंबातीने म्हटलं आहे.
प्रत्येकाला माहित आहे की, धोनीला खेळाडूमधील सर्वोत्तम कशी काढून घेयची हे माहित आहे आणि तो ते सिद्ध करत आहे. त्याने सीएसकेकडून खेळलेल्या अनेक परदेशी खेळाडूंनाही उत्कृष्ट कामगिरी करायला लावली. माझ्या मते धोनीकडे हे आधीच आहे. मला ते कसे व्यक्त करावे हे कळत नाही कारण एकतर त्याला आशीर्वाद मिळाला आहे किंवा त्याने खेळात कठोर परिश्रम केले आहेत आणि त्याचं फळ मिळालं आहे, असं अंबाती रायडू म्हणाला आहे.
IPL 2024 Auction : धोनीचा नवा डाव! 16 कोटीच्या बेन स्टोक्सच्या जागी 'या' तीन खेळाडूंचं नाव चर्चेत
धोनीचा निर्णय योग्य वाटत नसतानाही तो असं का करत आहेत?, असा प्रश्न अनेकवेळा पडायचा. पण दिवसाच्या शेवटी, निकालांनी तो बरोबर असल्याचं त्याने दाखवून दिलंय आणि त्याचा निर्णय 99.9 टक्के वेळेस योग्य असल्याचं सिद्ध झालंय. तो बर्याच काळापासून हे करत आहे आणि मला वाटत नाही की भारतीय क्रिकेटमध्ये त्याच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं कोणीही आहे. याचं कारण त्यांचं यश आहे, असं म्हणत अंबाती रायडू याने धोनीचं कौतूक केलं आहे.