IPL 2024 Auction Dubai: इंडियन प्रीमिअर लीग 2024  साठी 19 नोव्हेंबरला म्हणजे मंगळवारी खेळाडूंचा लिलाव (IPL Mini Auction) होणार आहे. आयपीएलमधले सर्व दहा संघ चांगले खेळाडू घेण्यासाठी सज्ज झालेत. आयपीएलच्या इतिहसात यंदा पहिल्यात लिलाव प्रक्रिया परदेशात होणार असून एक महिला खेळाडूंचा लिलाव करणार आहे. आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी 333 खेळाडूंचं रजिस्ट्रेशन करण्यात आलं आहे. यापैकी 77 खेळाडूंना खरेदी केलं जाणार आहे. या 77 खेळाडूंवर करोडोची बोली लागणार आहे. आयपीएलचा हा मिनी ऑक्शन सोहळा प्रेक्षकांना मोफत ऑनलाईन पाहाता येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल ऑक्शनपूर्वीच सर्व दहा संघांनी आपल्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची (Retain and Release Player) यादी जाहीर केली आहे. अनेक संघांनी महत्त्वाच्या खेळाडूंना रिलीज केलं आहे. त्यामुळे यंदा लिलावात काही मोठी नावंही दिसणार आहेत. शिवाय काही नव्या खेळाडूंवसुद्धा फ्रँचाईजीचं लक्ष असणार आहे. ऑक्शनपूर्वची मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) ट्रेड केलं आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात हार्दिक पांड्या गुजरात टायटन्सचा कर्णधार होता. आता हार्दिककडे मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. हार्दिक पांड्याला कर्णधारपदी नियुक्त केल्यानंतर युजर्सने मुंबई इंडियन्सला चांगलाच ट्रोल केलं होतं. 


77 खेळाडूंसाठी  262.95 
आयपीएल लिलवासाठी 333 खेळाडू असले तरी केवळ 77 खेळाडूंवरच बोली लागणार आहे. या 77 खेळाडूंसाठी फ्रँचाईजी तब्बल  262.95 कोटी रुपये खर्च करणार आहे. यात 30 विदेशी खेळाडूंचाही समावेश आहे. चेन्नई सुपर किंग्सकडे 31.4 रुपये उपलब्ध असून 6 खेळाडूंचा स्लॉट आहे. दिल्ली कॅपिटल्सकडे  28.95 कोटी रुपये शिल्लक असून 9 खेळाडू खरेदी करु शकतात. गुजरात टायटन्सकडे 38.15 कोटी रुपये असून त्यांना 8 खेळाडू खरेदी करण्याची मुभा असणर आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडे  32.7 कोटी रुपये शिल्लक असून त्यांना 12 खेळाडू निवडता येणार आहेत. मुंबई इंडियन्सकडे 17.75 कोटी रुपये बाकी असून त्यांना 8 खेळाडू खरेदी करता येणार आहेत. 


किती परदेशी, किती भारतीय खेळाडू
333 खेळाडूंमध्ये 214 भारतीय तर 119 खेळाडू परदेशी आहेत. यात 111 खेळाडू कॅप्ड तर 215 खेळाडू अनकॅप्ड आहेत. 333 खेळाडूंपैकी 23 खेळाडूंची बेस प्राईज 2 कोटी रुपये इतकी आह. तर 13 खेळाडूंची बेस प्राईज 1.5 कोटी रुपये आहे. याशिवाय 1 कोटी, 75 लाख, 50 लाख, 40 लाख, 30 लाख आणि 20 लाख रुपये बेस प्राईज असलेले खेळाडूही लिलावासाठी उपलब्ध असणार आहेत. 


या खेळाडूंवर असणार फ्रँचाईजींची नजर
भारताचा दिग्गज अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनने वर्तवलेल्या भाकितानुसार ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि पॅट कनिन्स यांच्यावर मिनी ऑक्शनमध्ये करोडोंची बोली लागू शकते. मिचेल स्टार्च आपला शेवटच्या आयपीएल सामना 2015 मध्ये खेळला होता. त्याने 13 आयपीएल सामन्यात 20 घेतल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय विश्वचषक जिंकून देणाऱ्या पॅटन कमिन्सने 42 सामन्यात 45 विकेट घेतल्या आहेत. यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकात चमकलेल्या न्यूझीलंडच्या रचिन रविंद्रवर सर्व फ्रँचाईजीची नजर असेल. विश्वचषकात रचिन रविंद्रने दमदार कामगिरी केली होती. 


दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्जीने देखील विश्वचषकात सर्वांना प्रभावित केलं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या वेगवान गोलंदाजावर लिलावात मोठी बोलू लागू शकते. तर विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताच्या पराभावाचं प्रमुख कारण ठरलेला ट्रेव्हिस हेडवरही कोट्यवधींची बोलू लागू शकते. याशिवाय डेरेल मिचेल, दिलशान मदुशंका आणि भारताचा ऑलराऊंड शार्दुल ठाकूरवरही फ्रँचाईजींची नजर असणार आहे.