IPL 2024 Auction Pat Cummins Kavya Maran Trolled:  इंडियन प्रिमिअर लिगच्या 2024 च्या लिलावामध्ये ऑस्ट्रेलियन संघाला वर्ल्ड कप 2023 मध्ये जेतेपद मिळवून देणाऱ्या पॅट कमिन्सला विक्रमी किंमत मिळाली आहे. पॅट कमिन्सला तब्बल 20 कोटी 50 लाख रुपये मोजून सनरायझर्स हैदराबादच्या संघाने करारबद्ध केलं आहे. आयपीएलच्या 17 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच कोणत्याही खेळाडूने 20 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. पॅट कमिन्सला उत्तम बोली मिळेल असा अंदाज बांधला जात होता. मात्र त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात बोली मिळेल असं कोणाला वाटलं नव्हतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमिन्सला मिळेलेली रक्कम पाहून अनेकांचे डोळे पांढरे पडले आहेत. तर माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाणपासून ते समालोचक हार्षा भोगलेंपर्यंत अनेकांनी खरोखरच पॅट कमिन्स एवढ्या किंमतीसाठी लायक आहे का असा प्रश्न विचारला आहे. मात्र या सर्व चर्चेदरम्यान एक सौंदर्यवती ट्रोल होताना दिसत आहे.


सौंदर्य आहे पण बुद्धी नाही


सन रायझर्स हैदराबादची मालकीण काव्य मारन या आज दुबईमध्ये झालेल्या आयपीएलच्या लिलावामध्ये सहभागी झाल्या आहेत. मात्र पॅट कमिन्ससारख्या खेळाडूवर तब्बल 20 कोटींहून अधिक रक्कम उधळणाऱ्या काव्या मारन यांना ट्रोल केलं आहे. काव्या मारन यांच्याकडे केवळ सौंदर्य आहे पण बुद्धी नाही असं अनेकांनी म्हटलं आहे.


नक्की वाचा >> पॅट कमिन्सवर तब्बल 20.5 कोटी उडवणाऱ्या काव्या मारनची एकूण संपत्ती पाहून डोळे फिरतील


अन्य एकाने तर काव्या मारन केवळ लिलावामध्ये हसतात बाकी वेळेस सामने सुरु असताना उदास असतात असा टोला लगावला आहे. अनेकांनी काव्या मारन यांनी वडिलांचा पैसा उडवल्याचेही म्हटलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या काही मोजक्या पोस्ट पाहूयात..


सौंदर्य आहे पण अक्कल नाही



हा जुगार वाटत नाही का?



केवळ लिलाव असतो तेव्हाच हसते



आता कमिन्स तिच्यासाठी काय पण करेल



आरसीबीवाले म्हणाले आम्ही वाचलो कारण समोरुन ते एवढ्या मोठ्या रक्कमेवर कमिन्ससाठी बोली लावत होते.



हा सौदा असा झाला



याचा शेवट असा होणार म्हणे...



आता आणि तेव्हा



पॅट कमिन्सने यंदा सनरायझर्सकडून खेळणारे हे निश्चित झालं असलं तरी विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराहसारख्या खेळाडूंपेक्षाही त्याला अधिक रक्कम मिळणार ही गोष्ट अनेकांना पचलेली दिसत नाही.