Indian Premier League 2024 Auction : वर्ल्ड कपमधील (World Cup 2023) टीम इंडियाच्या पराभवानंतर आता सर्वांचं लक्ष आयपीएलवर असणार आहे. आयपीएलच्या 17 व्या हंगामाचा लिलाव (IPL 2024 Auction) पुढील महिन्यात म्हणजेच 19 डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. आयपीएलच्या इतिहासात भारताबाहेर लिलाव होण्याची ही पहिलीच वेळ असेल. त्यामुळे आता लिलावात कोण बाजी मारणार? कोणता खेळाडू कोणत्या संघात असेल? यावर आता चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच आता वर्ल्ड कपमध्ये भारताला पराभवाची धूळ चारणाऱ्या ट्रॅव्हिस हेड (Travis Head) याच्या लिलावावर देखील सर्वांचं लक्ष असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल लिलावात निश्चितपणे चार ते सहा खेळाडू असे आहेत, ज्यांच्यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत. यातील एक खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड... सलामीवीर ट्रॅव्हिस हेडची (Travis Head In IPL 2024 Auction) सध्या सर्वाधिक चर्चा होतीये. मोठ्या सामन्यात चांगली कामगिरी करणं ही ट्रॅव्हिस हेडची सवयच आहे. साऊथ अफ्रिका असो वा भारत त्याने चमकदार कामगिरी करून दाखवली. त्यामुळे त्याला संघात घेण्याची तयारी सर्व संघाची असणार आहे.


बीसीसीआयने (BCCI) कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्याची अंतिम 26 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या 6 दिवसात कोणत्या संघात कोणते खेळाडू खेळणार? यावर सर्वांची नजर असणार आहे. लखनऊ सुपर जायंट्स सोबत असलेल्या वेस्ट इंडिजचा खेळाडू रोमॅरियो शेफर्डचा पुढील हंगामासाठी मुंबई इंडियन्सोबत व्यवहार करण्यात आला आहे.


IPL 2024 : रचिन रविंद्र आयपीएलमध्ये कोणाकडून खेळणार? CSK की RCB? स्पष्टच म्हणाला, 'माझ्या मनात नेहमी...'


दरम्यान, भारतीय मैदानात डावखुऱ्या ऑलराऊंडर्सला मोठं महत्त्व असतं. त्यामुळे न्यूझीलंडच्या रचिनला मोठी बोली लागणार यात शंका नाही. दमदार कामगिरीमुळे न्यूझीलंडचा 23 वर्षीय रचिन रवींद्र ऑक्टोबर महिन्यासाठी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्काराचा मानकरी ठरला होता. त्यामुळे आता यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2024) रचिन कोणत्या संघाकडून खेळणार? असा सवाल विचारला जात आहे.