IPL 2024 PBKS Beat KKR Salman Khan Post: पंजाब किंग्ज इलेव्हनच्या संघाने विक्रमी कामगिरी करत यापूर्वी टी-20 क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाला न जमलेली कामगिरी शुक्रवारी करुन दाखवली. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ईडन गार्डन्सच्या मैदानावर झालेल्या 42 व्या सामन्यात कोलकात्याच्या संघाच्या 261 धावा केल्या. पंजाबच्या संघाने यशस्वीपणे ही धावसंख्या गाठली. विशेष म्हणजे 8 बॉल आणि 8 विकेट्स राखून पंजाबने हा सामना जिंकला. जॉनी बेस्ट्रोच्या धमाकेदार शतकाच्या जोरावर आणि शशांक सिंहने केलेल्या दमदार फटकेबाजीच्या सहाय्याने पंजाबच्या संघाने अशक्य वाटणारं हे लक्ष्य गाढलं. आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदाच कोणत्याही संघाने 250 पेक्षा अधिक धावांचं लक्ष यशस्वीपणे गाठलं. 


शाहरुख आणि प्रितीची चर्चा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकाता आणि पंजाबमधील या सामन्याला अजून एक किनार होती ती म्हणजे मनोरंजनसृष्टीमधील 2 कलाकारांचं कनेक्शन! अभिनेता शाहरुख खान हा कोलकात्याचा संघमालक आहे. तर पंजाबची मालकीण अभिनेत्री प्रिती झिंटा आहे. त्यामुळे हा सामना वीर आणि झारा या दोघांमधील असल्याची चर्चा सोशल मीडियावर होती. या सामन्यामध्ये मोठी धावसंख्या उभारल्यानंतरही कोलकात्याच्या हाती निराशाच लागली. त्यामुळे या विजयानंतर एक वेगळीच पोस्ट व्हायरल झाली. ही पोस्ट तब्बल 10 वर्षांपूर्वीची असून ती सुद्धा कोणत्या साध्यासुध्या व्यक्तीची नाही तर चक्क बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची आहे. या पोस्टवर पंजाबच्या संघाच्या अधिकृत एक्स (ट्वीटर) हॅण्डलनेही प्रतिक्रिया नोंदवली आहे हे विशेष!


सलमान काय म्हणाला होता?


2014 साली सलमान खानने त्याच्या एक्स (ट्वीटर) हॅण्डलवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये सलमानने, 'झिंटाचा संघ जिंकला का?' असा प्रश्न सलमानने विचारला होता. 28 मे 2014 रोजी सलमानने केली ही पोस्ट पंजाबने विक्रमी कामगिरी करत 262 धावा यशस्वीपणे केल्यानंतर व्हायरल झाली आहे. 



नक्की वाचा >> World Cup: जहीरच्या 'टीम इंडिया'त एकही अंतरराष्ट्रीय सामना न खेळलेला खेळाडू; संपूर्ण संघ पाहून बसेल धक्का


पंजाबने केला रिप्लाय


सलमानच्या या जुन्या पोस्टचे स्क्रीन शॉट व्हायरल झाल्यानंतर पंजाबच्या संघाने सामना संपल्यानंतर रात्री दीड वाजता सलमानची ही पोस्ट कोट करुन रिपोस्ट केली. पंजाबच्या संघाने या पोस्टला रिप्लाय करत, 'मॅचही जिंकली आणि मनंही जिंकली' असं म्हटलं आहे.



टी-20 क्रिकेटमध्ये यशस्वीपणे धावांचा पाठलाग करणारे संघ


> 262/2 - पंजाब विरुद्ध कोलकाता - कोलकाता (आयपीएल, 2024)
> 262/7 - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद - बंगळुरु (आयपीएल, 2024)
> 259/4 - दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज - सेंच्युरियन (2023)


नक्की पाहा >> अशी बॅटिंग कधी पाहिलीच नसेल... हे फक्त पाकिस्तानात घडू शकतं; 'हा' Video पाहा


> 254/3 - मिडलसेक्स विरुद्ध सुरे - ओव्हल (टी-20 बास्ट, 2023)
> 253/8 - क्वेटा ग्लॅडिएटर्स विरुद्ध मुल्तान सुल्तान - रावळपिंडी (पाकिस्तानी सुपर लीग 2023)