IPL 2024: लखनऊ सुपर जायंट्स संघात मोठे बदल, संपूर्ण कोचिंग स्टाफच बदलला
IPL 2024 Lucknow Super Giants Team : येत्या 22 मार्चपासून आयपीएलच्या सतराव्या हंगामाला सुरुवात होतेय. त्याआधी आयपीएलमधल्या लखनऊ सुपर जायंट्स संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. लखनऊ संघाने कोचिंग स्टाफमध्ये मोठा दल केला आहे.
IPL 2024 Lucknow Super Giants Team: आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्सबरोबर (Gujrat Titance) लखनऊ सुपर जायंट्सने एन्ट्री केली. पहिल्या दोन हंगामात लशनऊने प्लेऑफमध्ये जागा पटकावली. पण जेतेपदापासून दोन पावलं दूरच राहिले. आत सतराव्या हंगामाआधी लखनऊने आपल्या कोचिंग स्टाफमध्येच बदल केला आहे. त्यामुळे नव्या हंगामात लखनऊचा चेहरा-मेहरा बदलला आहे. नव्या इराद्याने लखनऊ संघ आयपीएलच्या (IPL 2024) मैदानात उतरणार आहे. गेल्या हंगामात लखनऊचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. पण या हंगामात तो खेळण्याची शक्यता आहे.
या हंगमात लखनऊने उपकर्णधारही बदलला आहे. गेल्या दोन हंगामात ऑलराऊंडर कृणाल पांड्या (Krunal Pandya) संघाचा उपकर्णधार होता. पण या हंगामात वेस्टइंडिजचा माजी कर्णधार आणि डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज निकोलस पूरनवर (Nicholas Pooran) ही जबाबदारी सोपवण्यात आला आहे.
कोचिंग स्टाफ बदलला
आयपीएलच्या नव्या हंगामासाठी लऊनऊने कोचिंग स्टाफमध्ये (Coaching Staff) मोठा बदल केला आहे. गेल्या हंगामात गौतम गंभीर लखनऊ संघाचा मेंटॉर होता. तर अँडी फ्लॉवर मुख्य प्रशिक्षक आणि विजय दाहिया सहाय्यक प्रशिक्षक होते. पण या हंगामात ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी प्रशिक्षक जस्टिन लँगर लखनऊचा मुख्य प्रशिक्षक असणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू लान्स क्लूझनर आणि भारताचा माजी खेळाडू एस श्रीराम यांना सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्न मॉर्केलवर गोलंदाजी कोचची धुरा सोपवण्यात आली आहे. तर जॉन्टी ऱ्होडस संघाचा फिल्डिंग कोच आहे.
मागच्या हंगामातील कामगिरी
आययपीएल 2022 मध्ये लखनऊने एन्ट्री केली, आपल्या पहिल्याच हंगात लखनऊच्या संघाने दमदार कामगिरी केली. साखळी सामन्यात तीसऱ्या क्रमांक जागा पटकावत प्ले ऑफमध्ये एन्ट्री केली. साखळी सामन्यात 14 पैकी तब्बल 9 सामन्यात लखनऊने विजय मिळवला. पण एलिमिनेटर सामन्यात लखनऊनला रॉयल चॅलेंजर्स बंगलोकडून लखनऊला 14 धावांनी पराभव पत्करावा लागला. 2023 च्या हंगामातही साखळीत लखनऊने 14 पैकी 8 सामने जिंकत तिसरा क्रमांक पटकावला. या जोरावर त्यांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला. पण एलिमिनिटेर राऊंडमध्ये मुंबई इंडियन्सने धूळ चारली.
लखनऊची जमेची बाजू
लखनऊ सुपर जाट्संची बलाढ्य फलंदाजी ही त्यांची जमेची बाजू आहे. लखनऊच्या क्विटन डिकॉकने गेल्या दोन हंगामात दमदार कामगिरी केली आहे. केएल राहुल आणि डिकॉक ही आयपीएलमधील सर्वात धोकादायक सलामीची जोडी मानली जाते. याशिवाय संघात निकोलक पूरनसारखा बेस्ट फिनिशर आहे. पूरनने गेला हंगाम गाजवला होता. पूरनबरोबर मार्कस स्टायनोसारखा गेम चेंजर्स कायले मायर्ससारखा आक्रमक फलंदाजही लखनऊमध्ये आहे. गोलंदाजीत रवी बिश्नोई, डेव्हिड विली हे गोलंदाज आहेत. पण सर्वांचं लक्ष असेल तर वेस्ट इंडियाचा स्टार गोलंदाज शामर जोसेफवर. याशिवाय नवीन उल हक, मोहसिन खानही दिमतीला आहेत. मोहसिन खान, यश ठाकूर, शिवम मावी हे ताज्या दमाचे गोलंदाजही संघात आहेत.
लखनऊची कमकूवत बाजू
लखनऊची कमकूवत बाजू म्हणजे संघात मधल्या फळीत खेळपट्टीवर पाय रोवून उभे राहाणारे फलंदाज नाहीत. सलामीची जोडी अपयशी ठरल्यास त्याचा फटका तळाच्या फलंदाजांना बसता. आणि याचा परिणाम संघाच्या धावसंख्येवर पाहिला मिळतो. यावेळी लखनऊने राजस्थान रॉयल्सच्या देवदत्त पडिक्कल संघात स्थान दिलं आहे. याशिवाय आयुष बडोनी, दीपक हुड्रा असे फलंदाजीह संघात आहेत. बडोनी आणि हुड्डा गेल्या हंगामात सपशेल फ्लॉप ठरले होते.
लखनऊ सुपर जाटंसचा संघ
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डिकॉक, निकोलस पूरन, आयुष बडोनी, काइल मेयर्स, मार्कस स्टोयनिस, दीपक हुडा, देवदत्त पडिक्कल, रवि बिश्नोई, नवीन-उल-हक, कृणाल पंड्या, युद्धवीर सिंह, प्रेरक मांकड, यश ठाकुर, अमित मिश्रा, मार्क वुड, मयंक यादव, मोहसिन खान, के. गौतम, शिवम मावी, अर्शिन कुलकर्णी, एम. सिद्धार्थ, एश्टन टर्नर, डेविड विली, मोहम्मद अरशद खान.