IPL 2024 : चेन्नई पॉईंट्स टेबलच्या टॉपवर! गुजरातची घसरगुंडी, `या` आहेत टॉप 4 टीम
IPL 2024 च्या 7 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टाइटन्सला तब्बल 63 धावांनी मात दिली आहे. या विजयासोबतच चेन्नईने पॉईंट्स टेबलचे शिखर गाठले आहे. पण यासोबतच गुजरातला मिळालेल्या मोठ्या पराभवामूळे पॉईंट्स टेबलमध्ये मोठा बदल झालेला आहे.
IPL 2024 Points table : चेन्नई सुपर किंग्स (chennai super kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात झालेल्या 7 व्या सामन्यात चेन्नईने एकतर्फी सामन्यात गुजरातला मात दिली. या विजयासोबतच CSK पॉईंट्स टेबलच्या टॉपवर पोहोचली आहे. या सामन्यात सुरूवातीपासूनच चेन्नईने आपले वर्चस्व दाखवन्यास सुरूवात केली होती. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईच्या फलंदाजांनी गुजरातच्या गोलंदाजांच्या दांड्या गूल करत 206 धावांचा विशाल डोंगर ऊभा केला होता. यात चेन्नईचा यूवा फलंदाज रचिन रविंद्र याने (Rachin Ravindran)23 बॉलमध्ये 51 धावांची तडाखेदार बॅटिंग करत चेन्नईला एका चांगल्या स्थितीत आणले. पण 206 धावांचा पिछा करताना गुजरातचा संघ फक्त 143 धावांपर्यंतच मजल मारू शकला होता. या सामन्यामुळे आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठा फरक पडलेला आहे. कारण गुजरातच्या (GT) या मोठ्या पराभवामूळे त्यांच्या रन-रेटवर पण खूप प्रभाव पडलेला आहे. तर गुजरात टायटन्स आपला रन-रेट कशा पद्धतीने सावरणार आणि आपला कमबॅक करणार ही महत्वाची गोष्ट ठरणार आहे.
हे चार संघ आहेत टॉप 4 मध्ये
चेन्नई सुपर किंग्सने आपल्या पहिल्या दोन सामन्यातुन दोघं सामने जिंकत आयपीएलच्या पॉईंट्स टेबलवर 4 अंकांसोबत पहिल्या क्रमांकाचे स्थान आपल्या नावावर केलेले आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या राजस्थान रॉयल्सने आपली एकमात्र मॅच जिंकत 2 अंकांसोबत दुसऱ्या स्थानावर आहे. तर तिसऱ्या स्थानावर कोलकत्ता नाईट रायडर्सनही आपली एकमात्र मॅच जिंकलेली आहे, पण केकेआरचा रन-रेट हा राजस्थानपेक्षा खराब असल्याने कोलकत्त्याने तिसऱ्या स्थानावर आपली मजल मारली आहे. तर पंजाब किंग्स ही 2 पैकी 1 मॅच जिंकत 2 पॉईंट्स सोबत चौथ्या स्थानावर आहे.
गुजरातला पराभव पडला महागात
शुभमन गिलच्या गुजरात टायटन्सला चेन्नई सुपर किंग्सने 7 व्या मॅचमध्ये एकतर्फी धूळ चारलेली आहे. यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये गुजरातला मोठा धक्का लागलेला आहे. गुजरात टायटन्सने आतापर्यंत आयपीएल 2024 मध्ये 2 मॅचेस मधून 1 मॅच जिंकलेली तर एक मॅच हरलेली आहे. गुजरातने पॉईंट्स टेबलमध्ये घसरगुंडी मारली. त्यामुळे आता गुजरात सहाव्या स्थानावर पोहोचली आहे. गुजरात टायटन्स सध्या 6 व्या स्थानावर आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ही पण 2 पैकी 1 मॅच जिंकत पाचव्या स्थानावर आहे.
हे संघ आहेत शून्यावर
आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करणारी मुंबई इंडियन्स सध्या तरी आपल्या पॉईंट्स टेबलचे खाते उघडण्यात अपयशी ठरलेली आहे. हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीखाली खेळणारी मुंबई इंडियन्सने आपला पहिला सामना अहमदाबादच्या मैदानावर गुजरात टायटन्सविरूद्ध गमावलेला होता. यामुळे मुंबई इंडियन्स ही पॉईंट्स टेबलच्या 8 व्या क्रमांकावर आहे. यासोबतच सनरायजर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स शून्य अंकांसोबत क्रमशः 7, 9 आणि 10 व्या क्रमांकावर आहे. तर आता पूढच्या सामन्यात बघण्यायोग्य गोष्ट असणार की, कोणता संघ आपला भोपळा फोडतो आणि टॉप 4 मध्ये आपली जागा निश्चित करतो.