IPL 2024 CSK MS Dhoni Special Bat: भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्रसिंह धोनी इंडियन प्रिमिअर लीगच्या 2024 च्या पर्वासाठी सज्ज होत आहे. धोनी चेन्नई सुपर किंग्जचं नेतृत्व करणार आहे. धोनीचं हे शेवटचं पर्व आहे. 42 वर्षीय धोनी नुकताच आगामी पर्वासाठी नेट्समध्ये सराव करताना पाहायला मिळाला. 2023 मध्ये चेन्नईच्या संघाला विक्रमी पाचव्यांदा आयपीएलचा चषक जिंकून देणाऱ्या धोनीचं शेवटचं पर्वही दमदार असावं अशी त्याच्या चाहत्यांबरोबर संघ सहकाऱ्यांचेही प्रयत्न असतील यात शंका नाही. तर आपलं शेवटचं पर्व चाहत्यांसाही खास असावं असा धोनीचा प्रयत्न असणार आहे. धोनी त्याच्या करिअरच्या सुरुवातीला होती तशी लांब केसांची हेअरस्टाइलमध्ये पुन्हा दिसू शकतो. मात्र आता त्याने केलेल्या एका कृतीमुळे चाहते भावूक झाले आहे.


20 वर्षांपूर्वीच्या लूकमध्ये दिसणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सन 2004-05 मध्ये धोनी त्याच्या लांब केसांच्या हेअरस्टाइलमुळे चर्चेत होता. अगदी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान परवेज मुशर्रफ यांनीही धोनीच्या या हेअरस्टाइलचं कौतुक केलं होतं. याच लूकमध्ये धोनी शेवटच्या आयपीएलमध्ये दिसू शकतो. जवळपास 20 वर्षानंतर धोनी या लूकमध्ये दिसणार आहे. याशिवाय यंदाच्या पर्वामध्ये धोनीची बॅटही खास असणार आहे.



धोनीची स्पेशल बॅट


2024 च्या आयपीएल पर्वात धोनीच्या बॅटवर यापूर्वी कधीही न पाहिलेला स्पॉन्सर दिसणार आहे. इंटरनेटवर धोनीचे सराव सत्रातील फोटो व्हायरल झाला आहे. या व्हायरल फोटोमध्ये धोनीच्या बॅटवर 'प्राइम स्पोर्टस'चं स्टीकर पाहायला मिळत आहे. 'प्राइम स्पोर्टस' हे झारखंडची राजधानी रांचीमध्ये असणारं धोनीच्या मित्राचं दुकान आहे. धोनीचा मित्र परमजीत सिंह म्हणजेच छोटू भैया या दुकानाचा मालक आहे.



चित्रपटामध्येही उल्लेख


क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीला धोनीला त्याच्या बॅटसाठी पहिला स्पॉन्सर मिळून देण्यात परमजीतचा महत्त्वाचा वाटा होता. 2016 साली प्रदर्शित झालेल्या महेंद्रसिंह धोनीच्या जीवनावर आधारित 'धोनी द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटामध्येही धोनीला मदत करणारा परमजीत आणि 'प्राइम स्पोर्टस' हे दुकान दाखवण्यात आलं आहे. 



धोनीवर कौतुकाचा वर्षाव


आपल्या मित्राने ऐन उमेदीच्या काळात आपल्याला बॅट मिळावी म्हणून घेतलेले कष्ट आणि दिलेलं योगदान स्मरणात ठेऊन यंदाच्या पर्वात धोनी स्वत:हून फुकटामध्ये 'प्राइम स्पोर्टस'ची जाहिरात आपल्या बॅटवरील स्टीकरमधून करणार आहे. धोनीनं आपल्या मित्राच्या मदतीची ठेवलेली ही अनोखी जाण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.


धोनीचा शेवटचा सामना


2019 साली एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये झालेला न्यूझीलंडविरुद्धचा सेमीफायनलचा सामना हा धोनीच्या अंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधील शेवटचा सामना होता. 15 ऑगस्ट 2020 रोजी धोनीने अचानक निवृत्तीची घोषणा केली होती. धोनी सध्या केवळ आयपीएल खेळत असून यंदाचं पर्व त्याचं खेळाडू म्हणून शेवटचं पर्व असेल असं सांगितलं जात आहे.