IPL 2023 फायनलचा गुजरात घेणार बदला? ऋतुराज-गिलच्या नेतृत्वाची आज परीक्षा
IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामातील सातवा सामना आज खेळवला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडिअमवर सामना रंगणार आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात चेन्नईने अंतिम सामन्यात गुजरातचा पराभव करत पाचव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं होतं.
IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये आज सातवा सामना खेळवला जाणार आहे. गतविजेती चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि उपविजेती गुजरात टायटन्स (GT) आमने सामने असणार आहे. पण सर्वांचं लक्ष असणार आहे ते दोन्ही संघांचे युवा कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि शुभमन गिलवर (Shubman Gill). दोघांच्या नेतृत्वाची आज परीक्षा असणार आहे. गिलचा गुजरात संघ गेल्या हंगामातल्या अंतिम फेरीतील पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर चेन्नईचा संघ घरच्या मैदनावर सलग दुसऱ्या विजयासाठी प्रयत्न करेल. चेन्नईत आज संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना खेळवला जाईल.
आयपीएलच्या या हंगामात गुजरात आणि चेन्नईने आपला सलामीचा सामना जिंकत दमदार सुरुवात केली आहे. चेन्नईने सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 6 विकेटने पराभव केला. तर गुजरातने आपल्या पहिल्याच सामन्यात पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सचा 6 धावांनी पराभव केला. आता विजयाची मालिका कायम ठेवण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. आयपीएल इतिहासात आतापर्यंत दोन्ही संघ पाचवेळा आमने सामने आले आहेत. यात गुजरातने तीनवेळा विजय मिळवाल. तर चेन्नईने दोन वेळा गुजरातवर मात केली आहे.
ऋतुराज-गिलच्या नेतृत्वाची परीक्षा
सामना चेन्नई विरुद्ध गुजरात असला तरी खरी परीक्षा असणार आहे ती युवा कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिलच्या नेतृत्वाची. प्रत्यक्ष मैदानात हे युवा कर्णधार कशी रणनिती आखणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. आयपीएलच्या एक दिवसआधीच महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपदावरुन पाय उतार होण्याचा निर्णय घेतला आणि संघाची धुरा ऋतुराजच्या खांद्यावर सोपवण्यात आली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ऋतुराजने आपल्या कौशल्याची झलक दाखवलीय. ऋतुराज गायकवाडलाही धोनीच्या चातुर्याचा फायदा मिळत आहे.
तर गुजरात टायटन्सचा पहिला कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने आपल्या संघात घेतलं आणि गुजरातच्या कर्णधारपदाची जागा रिकामी झाली. संघात दिग्गज खेळाडू असतनाही संघ व्यवस्थापनाने युवा शुभमन गिलवर विश्वास टाकला. शुभमन गिल केवळ 24 वर्षांचा आहे आणि यंदाच्या आयपीएलमधला तो सर्वात कमी वयाचा कर्णधार आहे. विशेष म्हणजे त्याच्यामागे आशिष नेहरा, अनुभवी डेव्हिड मिलर, केन विल्यमसन सारख्या दिग्गजांचा हात आहे.
चेन्नई संघात बदल होणार?
गुजरात विरुद्धच्या सामन्यात चेन्नईच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. पहिल्या सामन्यात चेन्नईचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे चांगलाच महागात पडला होता. त्याच्या जागी मुकेश कुमारला संधी मिळण्याची शक्यता आहे.
चेन्नई सुपर किंग्स
ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), एमएस धोनी (विकेटकीपर), मोईन अली, दीपक चाहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, राजवर्धन हंगेरकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिशेल सेंटनर, सिमरजीत सिंह, निशांत सिंधु, प्रशांत सोलंकी, महेश तीक्ष्णा, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकुर, डेरिल मिशेल, समीर रिजवी, मुस्ताफिजुर रहमान, अरवेल्ली अवनीश राव (विकेटकीपर)।
गुजरात टायटन्स
शुभमन गिल (कर्णधार), डेविड मिलर, मॅथ्यू वेड, ऋद्धिमान साहा, केन विलियमसन, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, दर्शन नालकंडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, नूर अहमद, साई किशोर, राशिद खान, जोशुआ लिटिल , मोहित शर्मा, अजमतुल्लाह उमरजई, उमेश यादव, शाहरुख खान, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, मानव सुथार, स्पेंसर जॉनसन, संदीप वॉरियर, बीआर शरथ.