IPL 2024 CSK vs KKR in Marathi : चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यात  आज (8 एप्रिल)  संध्याकाळी 7.30 एमए चिदंबरम स्टेडियमवर सामना होणार आहे. चेन्नईला गेल्या दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे चेन्नई पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर येण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे कोलकाता संघाचा अव्वल स्थान गाठण्याचा प्रयत्न असणार आहे. कोलकाता संघ आतापर्यंतच्या आयपीएल 2024 सामन्यात अजेय आहे. कोलकाता नाईट रायडर्सने या 17 व्या हंगामात आतापर्यंत एकूण तीन सामने खेळले असून या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. मात्र आजच्या सामन्यात कोणता संघाचा विजय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  दोन्ही संघ विजय मिळवण्यासाठी संतुलित संघाची निवड करतीलच. चला तर मग जाणून घेऊया चेन्नई आणि कोलकाता यांच्यातील संभाव्य प्लेईंग 11 आणि पिच रिपोर्ट...


दोन्ही संघांची हेड टू हेड 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नई आणि कोलकाता यांच्यात आतापर्यंत एकूण 28 सामने झाले आहेत. त्यापैकी 18 सामने चेन्नईने जिंकले आहेत. कोलकाताने 10 सामने जिंकले आहेत. आयपीएलच्या सुरुवातीपासून चेन्नईने कोलकाताच्याविरुद्धातील दोन्ही लीग सामने कधीही गमावले नाहीत. आयपीएल 2012 मध्ये, दोन्ही संघ अंतिम फेरीत आमनेसामने होते. तर KKR ने 5 गडी राखून विजय नोंदवला आणि त्यांची पहिली IPL ट्रॉफी जिंकली.


अशी असेल खेळपट्टी


चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम: स्टेडियमवर नेहमीच फिरकीपटूंचे वर्चस्व असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. मात्र यंदाचे मैदान वेगळे असल्याचे दिसून येत आहे. सामन्यात वेगवान गोलंदाजांना मदत मिळाली तर फिरकी गोलंदाजांना संघर्ष करावा लागला. संथ गोलंदाजांनी खेळावर वर्चस्व राखावे अशी अपेक्षा आहे. केकेआर हा एक असा संघ आहे जो चेन्नईच्या पृष्ठभागावर संथ असूनही चांगली कामगिरी करू शकतो. या खेळपट्टीवर फलंदाजाचा दबदबा असेल. चेन्नईतील या मैदानावर 200 धावांचा टप्पा पार केला होता.  तर त्याशिवाय आरसीबीने 173 धावा पूर्ण केल्या होत्या. आजच्या सामन्यात फलंदाजांचे वर्चस्व राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.


हवामानाचा अंदाज


हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार चेन्नईतील आजचे हवामान स्वच्छ असेल. पावसाची शक्यता नाही. दिवसाचे तापमान 31 ते 35 अंशांच्या दरम्यान राहील आणि आर्द्रता 74 टक्क्यांच्या पुढे जाईल. 


सीएसके संघाची संभाव्य प्लेईंग 11


रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी/मिशेल सँटनर, एमएस धोनी, दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश थेक्षाना.


केकेआर संघाची संभाव्य प्लेईंग 11


सुनील नरेन, फिल सॉल्ट, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती