DC vs GT: प्लेऑफच्या शर्यतीत कोण मारणार बाजी, पंत की गिल? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड
IPL 2024, DC vs GT: आज दिल्ली आणि गुजरात एकमेकांशी भिडणार. या दोन्ही संघांचा प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्याचा प्रयत्न असणार आहे. पाह आजच्या सामन्यातील पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड...
IPL 2024 DC vs GT Check head to head record: आयपीएलच्या 17 व्या हंगामातील 40 वा सामना (24 एप्रिल) दिल्ली कॅपिट्ल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होईल. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दिल्ली आणि गुजरात या दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. आयपीएलच्या चालू हंगामात दिल्लीने तीन, तर गुजरातने चार विजय मिळवले असून दोन्ही संघांना प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची आशा कायम राहावी, यासाठी विजय आवश्यक असणार आहे. एकंदरित पंत की गिल? कोण मारणार विजयाची बाजी हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत आणि गुजरातचा कर्णधार शुभमन गिल किंवा या दोन्ही खेळाडूंच्या नेतृत्वाखाली आजचा सामना रंगणार आहे. 17 एप्रिलला अहमदाबाद येथे झालेल्या सामन्यात दिल्लीने गुजरातचा 89 धावांनी पराभव केला होता. दिल्ली संघाने ही लढत सहा विकेटने जिंकली होती. मात्र आजच्या सामन्यात आता गुजरातचा संघ या पराभवाचा वचपा काढण्यासाठी मैदानात उतरताना दिसणार आहे. तसेच हे दोन्ही संघ गुणतालिकेत तळाशी आहेत. परिणामी या दोघांसाठी आजचा सामना (DC vs GT) अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. 17 व्या हंगामात झालेल्या शेवटच्या सामन्यात दिल्ली संघाने गुजरातचा घरच्या मैदानावर पराभव केला होता. यावेळी शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्याच घरच्या मैदानात पराभूत करून बदला घेण्यासाठी मैदानात उतरेल.
हेड टू हेड आकडेवारी
आयपीएलच्या या हंगामात दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टाइटन्स (Delhi Capitals vs Gujarat Titans) यांच्यात चार वेळा सामना खेळला गेला आहे. यामध्ये दोन्ही संघांने प्रत्येकी 2-2 सामने जिंकले आहेत. या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सच्या सर्वात जास्त धावा म्हणजेच 171 धावा केल्या आहे. तर दुसरीकडे दिल्ली संघांने आतापर्यंत 162 धावा करण्यात यशस्वी झाले आहेत. तर शेवटच्या सामन्यात दिल्ली संघाने गुजरात संघाचा पराभव केला होता.
अशी असेल खेळपट्टी
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी त्याच्या संथपणामुळे फिरकीपटूंसाठी जास्त फायदेशीर ठरेल. या खेळपट्टीवर चेंडू थोडा पॉज घेऊन बॅटवर येतो. आयपीएल (IPL 2024) च्या या हंगामात येथे फक्त एकच सामना खेळला गेला आहे आणि त्यात खूप धावा झाल्या आहेत. सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली यांच्यात झालेल्या या सामन्यात SRH संघाने प्रथम फलंदाजी करत 266 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ अवघ्या 199 धावा करू शकला. यावेळी दिल्लीची खेळपट्टी थोडी वेगळी दिसते. दिल्ली आणि गुजरात यांच्यात होणाऱ्या आजच्या सामन्यात मोठी धावसंख्या पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11
दिल्ली कॅपिटल्स: डेव्हिड वॉर्नर, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, एनरिक नॉर्सिया, खलील अहमद, मुकेश कुमार.
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, आर साई किशोर, मोहित शर्मा, नूर अहमद आणि संदीप वॉरियर.