IPL 2024 Hardik Pandya Vs Rohit Sharma: इंडियन प्रिमिअर लीगच्या जेतेपदावर 5 वेळा नाव कोरणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाने हार्दिक पंड्याकडे यंदाच्या पर्वाआधीच कर्णधारपद सोपवलं आहे. नेमकी किती रक्कम मोजून हार्दिकला मुंबईने गुजरात टायटन्सच्या संघाकडून आपल्या संघात ट्रेड केलं याचा खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र संघात घेतल्यानंतर रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून तेही पंड्याकडे सोपवण्यात आलं आहे. पाचवेळा जेतेपद मिळवून देणाऱ्या रोहितला अशाप्रकारे तडकाफडकी पदावरुन हटवल्याने चाहत्यांबरोबरच अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली होती. 


डिव्हिलियर्सने नोंदवलं आपलं मत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह यासारख्या खेळाडूंनी सूचक पद्धतीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट केल्या होत्या. रोहित शर्माची पत्नी ऋतिका सजदेहने मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचरला फोन केला होता. हा निर्णय अनेक स्तरांवर चुकीचा असून त्याबद्दल मुख्य प्रशिक्षकही पूर्ण माहिती देत नसल्याचं ऋतिका म्हणाली होती. मात्र काही दिवसांनंतर हे नेतृत्वबदलाचं वादळ शांत झालं. याबद्दल हार्दिक किंवा रोहितने कोणतीही प्रतिक्रिया नोंदवली नाही. मात्र आता याच प्रकरणाबद्दल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा खेळाडू ए. बी. डिव्हिलियर्सने आपलं मत नोंदवताना सारा प्रकार एक मोठी कॉन्ट्राव्हर्सी असल्याचं म्हटलं आहे. तसेच हार्दिक पंड्याला मैदानात पाहण्यासाठी आपण उत्सुक आहोत असंही ए. बी. डिव्हिलियर्स म्हटलं आहे.


रोहितची जागा हार्दिकने घेतली


"तो (मुंबई इंडियन्सचा संघ) आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांच्याकडे पाच जेतेपदं आहेत. मागील काही महिन्यांमध्ये सर्वात मोठा वाद (Big Controversy) असा होता की रोहित शर्माची कर्णधारपदाची जागा हार्दिक पंड्याने घेतली आहे. मात्र ते यासंदर्भात समाधानी दिसत आहेत. त्यांनी हा निर्णय स्वीकारल्याचं दिसतंय. हार्दिक पंड्याला त्याच्या मूळ संघात म्हणजेच मुंबई इंडियन्समध्ये पाहून बरं वाटत आहे. ते यंदाच्या पर्वाची सुरुवात गुजरात टायटन्सविरोधात करणार आहेत हे किती रंजक आहे," असं ए. बी. डिव्हिलियर्स त्याच्या युट्यूब चॅनेलवर म्हटलं आहे.


नक्की पाहा >> पंड्याकडून दिग्गजांना अपमानास्पद वागणूक? चाहते म्हणाले, 'मुंबई इंडियन्सची निवड चुकलीच'; पाहा Video


अपेक्षा आहे की हार्दिक...


"हार्दिक पंड्याबद्दल बोलायचं झालं तर त्याला उत्तम पुनरागमनाची गरज आहे. तसं झालं नाही तर संघाचा समतोल फारचा प्रभावी वाटत नाही. मला वाटतं हार्दिक पंड्या हा मोठी भूमिका पार पडणार आहे. अपेक्षा आहे की तो गोलंदाजीही करेल आणि मुंबई इंडियन्सला असलेली अष्टपैलू खेळाडूची गरज तो भरुन काढेन," असंही ए. बी. डिव्हिलियर्स म्हणाला.


मुंबईचा पहिला सामना कधी?


मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 24 मार्च रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे. सध्या मुंबईचा संघ वानखेडे स्टेडियममध्ये सराव करत आहे.