IPL 2024: आयपीएल 2024 मध्ये रोहित शर्माऐवजी हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन असणार आहे. टिम मॅनेजमेंटने यासंदर्भात घोषणा केल्यानंतर मुंबई इंडियन्सचे फॉलोअर्स झटक्यात कमी झाले. रोहित आणि एमआयच्या फॅन्सकडून या निर्णयावर टीका केली जात आहे. दरम्यान आता दिग्गज माजी खेळाडू सुनिल गावस्कर यांनी यावर विधान केले आहे. यात त्यांनी गावस्कर यांनी हार्दिक पांड्याचे तोंडभरुन कौतुक केले आहे. पण रोहित शर्माबद्दलच्या वक्तव्याने हिटमॅनच्या फॅन्सच्या भावना दुखावल्या आहेत. त्यानंतर तर आता रोहित शर्माच्या फॅन्सच्या रागाला पारावर उरला नाही. असं काय म्हणाले सुनिल गावस्कर? याबद्दल जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक पांड्याला इंडियन प्रीमियर लीग 2024 साठी मुंबई इंडियन्सचा कर्णधार होण्यासाठी सुनील गावस्कर यांनी पाठिंबा दिला आहे. नव्या कर्णधाराखाली नव्या विचाराची गरज भासू लागल्याने संघ व्यवस्थापकाने हा निर्णय घेतल्याचे गावसकर म्हणाले. 19 डिसेंबर रोजी होणार्‍या आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी एका ऐतिहासिक ट्रेडमध्ये, हार्दिक पंड्या गुजरात टायटन्सकडून मुंबई इंडियन्समध्ये परतला. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये मोठ्या बदलांची चर्चा सुरू झाली.


'रोहित शर्मा थकलेला दिसला...'


2022 च्या सुरुवातीपासून तो रोहित शर्मा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व करत होता. गेल्या दोन हंगामात मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवताना रोहित शर्मा थकलेला दिसत होता रोहितमध्ये जो उत्साह आम्ही पूर्वी पाहिला होता तो कमी दिसत होता, असे गावस्कर म्हणाले. 


MI कशीतरी प्लेऑफसाठी पात्र 


गावस्करांच्या विधानांमुळे रोहित शर्माचे फॅन्स खूपच नाराज आहेत. गेल्या दोन वर्षांत रोहितचे फलंदाजीतही योगदान थोडे कमी झाले आहे. त्याला मोठी धावसंख्या करता आली नाही. टीम फक्त 9 व्या किंवा 10 व्या क्रमांकावर येत होती आणि गेल्या हंगामात कशीतरी प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला होती. आपण चूक की बरोबर यामध्ये जाऊ नये, पण त्याने घेतलेला निर्णय संघाच्या फायद्याचा आहे, असेही ते म्हणाले.


मुंबई इंडियन्सने शेवटचे 2020 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. 5 वेळचे चॅम्पियन 2021 आणि 2022 मध्ये प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकले नाहीत. एमआयची टीम 2023 मधील पहिल्या एलिमिनेशन सामन्यात बाहेर पडली. 2022 मध्ये फ्रँचायझी पॉइंट टेबलच्या खाली राहिल्याची आठवण गावस्करांनी करुन दिली. 


हार्दिक पांड्याचे कौतुक


गावस्कर यांनी हार्दिक पांड्याचे कौतुक खूप कौतुक केले आहे. 'मला वाटते की हार्दिक हा तरुण कर्णधार आहे ज्याने रिझल्ट दिला आहे. कर्णधार बदलामुळे फ्रँचायझीलाच फायदा होईल. नुकसान होणार नाही, असे त्यांना वाटते. हार्दिकने गुजरातला दोनदा अंतिम फेरीत नेले आहे. या सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित करून त्याला कर्णधार बनवण्यात आले आहे, असे गावस्कर सांगतात. 


रोहित पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणार 


सर्व वाद असूनही, रोहित शर्मा आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा भाग असेल. 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या आगामी 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या तयारीसाठी रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला आहे. 37 वर्षीय रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने घरच्या मैदानावर विश्वचषक फायनल खेळली, पण निराशा झाली. 


दुसरीकडे, विश्वचषकात बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात दुखापतीमुळे हार्दिक पांड्या मैदानाबाहेर आहे. जानेवारी 2024 मध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी अष्टपैलू खेळाडू पांड्या पुनरागमन करेल असे म्हटले जात आहे.