IPL 2024: आयपीएल सुरु असताना नवा वाद; तिकीटांचा काळाबाजार होत असल्याचा माजी खेळाडूचा आरोप
SRH vs CSK : आयपीएल 2024 ला सुरूवात झालीये आणि या सीझनमध्ये आधीच 17 सामने खेळले गेले आहेत. एकीकडे क्रिकेट फॅन्स आयपीएलची मजा लुटत आहेत, तर दुसऱ्या बाजूला मॅच तिकीटांचा काळाबाजार होत आहे, असा खुलासा माजी भारतीय क्रिकेटर मोहम्मद अजहरूद्दीन यांनी केला आहे. यावरून अजहरूद्दीन यांनी हैदराबाद क्रिकेट असोसिएशनवर मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत.
SRH vs CSK : आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत 17 सामने खेळले गेले आहेत, आणि या प्रत्येक सामन्यात सारे क्रिकेट फॅन्स आयपीएलचा मजाही लुटत आहे. दर्शकांच्या मिळत असलेल्या या उत्साहामुळे प्रत्येक क्रिकेट स्टेडियम हे प्रत्येक मॅचला खचा-खच भरलेले असते. अशातच भारताचा माजी क्रिकेटर मोहम्मद अजहरूद्दीन यांनी आयपीएलची 2024 ची 18 वी मॅच, म्हणजेच सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणाऱ्या सामन्याआधी हैदराबाद क्रिकेट असोसिएशनवर प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यांनी आपल्या सोशल मिडिया अकाऊंट 'X' वर केलेल्या पोस्ट मार्फत एचसीएवर टीका केली आहे.
पोस्टमध्ये काय लिहिलयं?
मोहम्मद अजहरूद्दीनने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, हैदराबादच्या मैदानावर आयपीएलचे सामने हे अतिशय खराब परिस्थितीत होतायत. खराब शौचालय, पाण्याची टंचाई, HCA मध्ये विनातिकीट लोकांना एंट्री, असोशिएशनच्या सदस्यांना एंट्रीपासून रोखणं, मॅच टिकिट्समध्ये होत असलेला काळाबाजार, यांसारख्या अनेक समस्या असून सुद्धा हैदराबादच्या स्टेडियमवर आयपीएलचे सामने होतायत. CSK मॅनेजमेंट पण या समस्यांपासून त्रस्त झाले आहे.
यासंदर्भात हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या टॉप काउंसिलने स्टेडियमच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्याचा वादा केला होता, पण याच्या बदल्यात पण केवळ खूप साऱ्या समस्याच मिळाल्या आहेत, समस्यांचे समाधान मात्र कुठ आहे? असं म्हणत मोहम्मद अजहरूद्दीनने एचसीएवर निशाना साधत त्यांना या प्रश्नांचे उत्तरं विचारली आहेत. मात्र हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने यावर अजूनपर्यंत काहीही उत्तर दिलेलं नाहीये. अशा परिस्थितीत हैदराबाद क्रिकेट असोसिएशन या गोष्टीला कशा पद्धतीने रिअॅक्ट करणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. आता हैदराबादच्या क्रिकेट स्टेडियमवर हैदराबाद आणि चेन्नई यांच्यात आयपीएल 2024 चा 18 वा सामना खेळला जाणार आहे.
हैदराबादची पिच फलंदाजीसाठी अनुकूल
आयपीएल 2024 मध्ये हैदराबादच्या मैदानावर फलंदाजांची चांदी झाली आहे. हैदराबादमध्ये झालेल्या शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरूद्ध SRH च्या फलंदाजांनी तब्बल 277 धावा ठोकल्या होत्या, बदल्यात मुंबईच्या फलंदाजांनी पण 246 धावा केल्या होत्या, यामुळे हे मैदान फलंदाजीसाठी खूप चांगले असल्यामुळे, हैदराबादविरूद्ध चेन्नई सामन्यात पण मोठ्या स्कोरची अपेक्षा करणं चुकीचं ठरणार नाही.