Rajasthan Royals SWOT Analysis : मागील हंगामात चांगली सुरूवात करून देखील थोडक्यात प्लेऑफ गमावणाऱ्या राजस्थानसाठी यंदाचा हंगाम 'यशस्वी' ठरणार आहे. राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) मागील हंगामात अखेरच्या 7 सामन्यात फक्त 2 सामने जिंकता आले. त्यामुळे जिंकलेली बाजी राजस्थानला गमवावी लागली. बटलर सारखा आक्रमक फलंदाज अन् आश्विन युझीची जोडी असताना देखील राजस्थानला हिरकावणी मिळाली. त्याला कारण होतं... राजस्थानमध्ये ऑलराऊंडरची कमतरता... राजस्थानमध्ये एकही ऑलराऊंडर नसल्याने राजस्थानला अनेक सामन्यात पराभव स्विकारावा लागला. आता राजस्थानने 4 ऑलराऊंडर्सला संघात घेऊन संजू सॅमसनने टीमला बहुआयामी स्वरूप देण्याचा प्रयत्न केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानसाठी कोण ठरणार 'बॉस' ?


राजस्थान रॉयल्सने यंदाच्या लिलावात वर्षी नव्या खेळाडूंवर डाव टाकला. रोवमन पॉवेल, शुभम दुबे, टॉम कोहलर-कॅडमोर, आबिद मुश्ताक आणि नांद्रे बर्गर यांना संघात सामील करून घेतलंय. त्यामुळे आता राजस्थानने ऑलराऊंडरची कमी भरून काढली आहे. रोवमन पॉवेल, शुभम दुबे आणि आबिद मुश्ताक यांच्यावर मिडल ऑर्डरची जबाबदारी दिली जाऊ शकते.  शिवाय आर अश्विनच्या रुपात देखील एक पर्याय राजस्थानसमोर असेल.


राजस्थानच्या जमेची बाजू


टॉप ऑर्डरमध्ये जॉस बटलर, यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन यांची तिघडी विरोधी संघांना नेहमी मारक ठरली आहे. यंदाच्या हंगामात देखील राजस्थानकडून अशी किमया पहायला मिळेल. तर फिरकीमध्ये रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल अन् ॲडम झाम्पा यांना पर्याय संजूसमोर असणार आहे. एवढंच नाही तर संदीप शर्मा, नवदीप सैनी अन् ट्रेंट बोल्ट राजस्थानसाठी गेम विनर ठरतील. 


राजस्थानचा एक्स फॅक्स


राजस्थानला फायनलमध्ये पोहचायचं असेल तर जॉस द बॉसला आपली दादागिरी दाखवावी लागेल. तर यशस्वीला जैसबॉलने धावा कुटाव्या लागतील. तर ध्रुव जुरैल नक्कीच राजस्थानसाठी एक्स फॅक्स ठरणार आहे. गोलंदाजी डिपार्टमेंटमध्ये आश्विन अण्णा आणि चहल नेहमीप्रमाणे कमाल दाखवतील. तर ट्रेंड बोल्ट खोऱ्याने विकेट्स काढेल, अशी अपेक्षा आहे.


संभाव्य प्लेइंग इलेव्हन - जॉस बटलर, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (C), रोवमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरैल, रियान पराग, आर अश्विन, युझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट आणि आवेश खान.


राजस्थान रॉयल्सचा संघ : संजू सॅमसन, जॉस बटलर, ध्रुव जुरेल, कुणाल राठौर, डोनोवन फरेरा, टॉम कोहलर-कॅडमोर, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जयस्वाल, रियान पराग, रोवमन पॉवेल, शुभम दुबे, रविचंद्रन अश्विन, आबिद मुश्ताक, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा, नवदीप सैनी, कुलदीप सेन, ॲडम झाम्पा, नांद्रे बर्गर, आवेश खान.