IPL 2024 RCB vs KKR : रिंकू सिंग... आयपीएल 2023 मधला सर्वात चर्चेत राहिलेला खेळाडू. आयपीएल 2023 मधला लखनऊ आणि कोलकाता दरम्यानच्या त्या सामन्याने त्याची ओळख सिक्सर किंग अशी बनली. या सामन्यात त्याने एकाच षटकात पाच षटकार लगावले. आणि रातोरात तो स्टार बनला. लखनऊच्या हातातोडांशी आलेला विजय रिंकू सिंगने (Rinku Singh) खेचून आणला. ज्या गोलंदाजाला त्याने पाच षटकार लगावले, त्या गोलंदाजाचं नाव होतं यश दयाल (Yash Dayal). या सामन्यानंतर यश दयाल अनेक दिवस आजारी होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या हंगामानंतर रिंकू सिंगने मागे वळून पाहिलं नाही. या कामगिरीच्या जोरावर रिंकूने थेट टीम इंडियात (Team India) पदार्पण केलं. आता टीम इंडियाचा तो हुकमी खेळाडू बनला आहे. तर यश दयाल पुन्हा एकदा नव्या संघासह नव्या हंगामात खेळण्यासाठी उतरला आहे. गेल्या हंगातील बदला घेण्यासाठी यश दयाल सज्ज झाला आहे.


रिंकू झिरो ते हिरो
रिंकू सिंग 2018 पासून कोलकाता नाईट रायडर्सबरोबर (Kolkata Night Riders) खेळत आहे. पहिल्या चार हंगामात केकेआरने रिंकूला 80 लाख रुपये दिले. पण 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये रिंकू सिंगला मोठं नुकसान सहन करावं लागलं. त्याच्यावर कोणीच बोली लावली नाही. अखेर कोलकाता नाईट रायडर्सने 55 लाखांची बोली लावत त्याला पुन्हा आपल्या संघात घेतलं. 2022 च्या हंगामात रिंकून मैदानात उतरण्याची फारशी संधी मिळाली नाही. पण 2023 चा आयपीएल हंगाम त्याच्यासाठी नशीब बदलवणारा ठरला. या हंगामातील कामगिरीने संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष त्याच्याकडे वळलं.


आयपीएलमधल्या कामगिरीच्या जोरावर त्याला टीम इंडियाचे दरवाजेही उघडले. गेल्या काही काळात रिंकूने भारतीय क्रिकेटसाठी अनेक स्फोटक खेळी केल्या. रिंकूने आयपीएलमध्ये 32 सामन्यात 748 धावा केल्या आहेत. तर टीम इंडियाकडून खेळताना 15 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 356 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. तर दोन एकदिवसीय सामन्यात त्याच्या खात्यात 55 धावा जमा आहेत. 


यश दयाल रिलीज
आयपीएल 2023 मध्ये वेगवान गोलंदाज यश दयाल जबरदस्त फॉर्मात होता. पण कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्याने त्याच्या फॉर्मवर परिणाम झाला. दयाल आजारी पडला आणि संपूर्ण हंगामा तो खेळू शकला नाही. आयपीएल 2024 च्या आधी झालेल्या ऑक्शनमध्ये लखनऊ सुपर जायंटसने त्याला रिलीज केलं. त्यानंतर आरसीबीने त्याच्यावर पाच कोटींची बोली लावत आपल्या संघात घेतलं. आता रिंकू सिंगबरोबरचा जुना हिशोब चुकता करण्याची यशकडे चांगली संधी आहे. 


आरसीबीची कामगिरी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची या हंगामातील सुरवात पराभवाने झाली होती. चेन्नई सुपर किंग्सने बंगळुरुवर मात केली. पण दुसऱ्या सामन्यात मात्र बंगळुरुने विजयाचं खातं उघडलं. विराट कोहलीने 77 धावा करत बंगळुरुला पंजाबविरुद्ध शानदार विजय मिळवून दिला. तर कोलकाता नाईट रायडर्सने विजयाने सुरुवात केली आहे.