आज RCB आयपीएल 2024 मधून बाहेर पडणार? जाणून घ्या Playoffs चं गणित
IPL 2024 RCB Qualify Chances 2024: मुंबईविरुद्धचा सामना जिंकल्याने चेन्नईचा संघ सध्या पॉइण्ट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी कायम आहे. दुसरीकडे आज सामना खेळणारा हैदराबादचा संघ चौथ्या स्थानी असून आरसीबी मात्र तळाशी आहे.
IPL 2024 RCB Qualify Chances 2024: इंडियन प्रिमिअर लीग 2024 च्या स्पर्धेमधील 30 वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबादच्या संघादरम्यान खेळवला जाणार आहे. या सामन्यामध्ये आरसीबीला विजय अत्यंत आवश्यक आहे. आपल्या 6 सामन्यांपैकी 5 सामने आरसीबीने गमावले आहेत. सध्या आरसीबीचा संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये तळाशी आहे. आजचा सामना पराभूत झाल्यानंतर आरसीबीचा संघ आयपीएलच्या प्ले ऑफच्या शर्यतीमधून बाहेर पडणार का? आरसीबी आणि हैदराबादचा संघ किती वेळा आमने-सामने आला आहे? या संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन काय असू शकते जाणून घेऊयात...
किती वेळा आमने-सामने आलेत दोन्ही संघ?
आरसीबी आणि हैदराबादचा सामना बंगळुरुमधील एम. चेन्नस्वामी स्टेडियमममध्ये खेळवला जाणार आहे. घरच्या मैदानावरील सामना असल्याने आरसीबीला फायदा होईल असं म्हटलं जात असलं तरी त्यांची गोलंदाजी ही सर्वात कमकुवत बाजू आहे. आजच्या दिवशी संघ कसा खेळ करणार यावरच सारं काही अवलंबून असणार आहे. आतापर्यंत आरसीबी आणि हैदराबादचा संघ 23 वेळा एकमेकांसमोर आला आहे. यापैकी हैदराबादने 12 सामने जिंकले आहेत. तर आरसीबीने 10 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. एक सामना रद्द करावा लागला.
चेन्नस्वामीमधील आकडेवारी काय सांगते?
चेन्नस्वामी स्टेडियममध्ये आरसीबी आणि हैदराबादचा संघ एकूण 8 वेळा आमने-सामने आले आहेत. त्यापैकी हैदराबादने 2 सामने जिंकलेत तर 5 सामने आरसीबीने जिंकले आहेत. एक सामना रद्द झाला आहे.
खेळपट्टी कशी?
चेन्नस्वामी स्टेडियमची खेळपट्टी अगदी सपाट आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन समजली जाते. या मैदानावरील बॉण्ड्री लाइन्स तुलनेनं लहान आहेत. तसेच खेळपट्टी अगदी सपाट असल्याने अधिक धावसंख्येचा सामना अपेक्षित आहे. किमान 200 हून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग या सामन्यात करावा लागू शकतो.
नक्की वाचा >> 'स्टम्पमागाची व्यक्ती त्यांना..'; CSK ने केलेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर पंड्याचं धोनीबद्दल विधान
आरसीबीची संभाव्य प्लेइंग इलेव्हन -
विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, सौरव चौहान, कॅमेरॉन ग्रीन, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), रीस टोपले, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.
सबस्टीट्यूट - सुयश प्रभुदेसाई, महिपाल लोमरोर, हिमांशू शर्मा, विजयकुमार विशक, स्वप्नील सिंग
सनरायझर्स हैदराबाद संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
ट्रॅव्हीस हेड, अभिषेक शर्मा, अदीन मारक्रम, राहुल त्रिपाठी, हेनरीक कार्ल्सन (विकेटकीपर), अबदुल समाद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स(कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.
सबस्टीट्यूट - वॉशिंग्टन सुंदर, नितीश रेड्डी, ग्लेन फिलिप्स, उमरान मलिक, मयांक मार्कंडे
नक्की पाहा >> ..अन् मैदानात रोहित शर्माची पॅण्टच सरकली! CSK vs MI सामन्यातील 'तो' Video व्हायरल
आज पराभूत झाल्यास आरसीबी प्लेऑफमधून बाहेर पडणार का?
पॉइण्ट्स टेबलची सध्याची स्थिती पाहिल्यास प्रत्येक संघ 5 ते 6 सामने खेळला आहे. त्यामुळे ही स्पर्धा अद्याप अर्ध्यावरही आलेली नाही. सध्या तरी आरसीबीचा संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये तळाशी आहे. आरसीबीचा चाहतावर्ग मोठा असला तरी त्यांना प्रत्यक्ष मैदानात उत्तम कामगिरी करण्यात सतत्याने अपयश येत आहे.
विशेष म्हणजे 2009 साली आरसीबीच्या संघाने अशाच परिस्थितीमधून दमदार पुनरागमन केलं होतं. 2011 लाही त्यांनी सलग 4 पराभव झाल्यानंतर पुढील टप्प्यात प्रवेश केला होता. त्याचप्रमाणे यंदाच्या पर्वाबद्दल बोलायचं झालं तर 6 पैकी 5 सामन्यांमध्ये पराभूत झालेल्या आरसीबीचे 8 सामने अजून बाकी आहेत. या 8 सामन्यांपैकी आरसीबीला 7 सामने जिंकावे लागणार आहे. आरसीबी 7 सामने जिंकला तर त्याचं प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित मानलं जात आहे. मात्र पुढील काही सामने आरसीबीने गमावले तर त्यांची स्पर्धमधून गच्छंती निश्चित आहे.
किती वाजता सुरु होणार सामना-
सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी प्रत्यक्ष खेळाला सुरुवात होईल.
कुठे पाहता येणार सामना-
या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी बरोबरच जीओ सिनेमा अॅपवर सामना लाईव्ह पाहता येईल.