IPL 2024 Rohit Sharma: इंडियन प्रिमिअर लीगमधील 2024 च्या पर्वातील सातव्या समान्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने गुजरात टायटन्सच्या संघावर तब्बल 63 धावांनी विजय मिळवला. मात्र या विजयानंतर सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सच्या संघातील हार्दिक पंड्याच (Hardik Pandya) चर्चेत आहे. विशेष म्हणजे आगामी टी-20 वर्ल्डकप 2024 (T20 World Cup 2024) मधील हार्दिक पंड्याची जागा धोक्यात असल्याची शक्यता आता चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे. गुजरातविरुद्धच्या मुंबईतील पहिल्या सामन्यामध्ये कथित पद्धतीने पंड्याने ज्याप्रकारे माजी कर्णधार रोहित शर्माला वागणूक दिली त्याचाही बदला रोहितला घेण्याची आयती संधी चालून आल्याच्या अनेक पोस्ट चेन्नईच्या दुसऱ्या विजयानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.


स्फोटक फलंदाजीने चाहते इम्प्रेस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, गुजरातचा कर्णधार शुभमन गीलने मंगळवारच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना तब्बल 206 धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि रचिन रविंद्र यांनी स्फोटक सुरुवात करुन दिली. त्यानंतर अजिंक्य रहाणे झटपट बाद झाला. मात्र चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या शिवम दुबेने स्फोटक फलंदाजी केली. या तरुण डावखुऱ्या फलंदाजाने अवघ्या 23 चेंडूंमध्ये 5 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 51 धावांची वेगवान खेळी केली. त्यानंतर डॅरेल मिचेल (20 बॉलमध्ये 24 धावा) आणि समीर रिझवी (6 बॉलमध्ये 14 धावा) यांच्या छोट्या खेळींच्या जोरावर चेन्नईने 200 चा टप्पा ओलांडला. यामध्ये शुभम दुबेच्या फटकेबाजीने रंगाळलेल्या चेन्नईच्या डावाला वेग मिळाला आणि त्यांना 200 चा टप्पा गाठून गुजरातच्या संघावर धावांचा पाठलाग करताना एक प्रकारचा मानसिक दबाव निर्माण करण्यात यश आलं. याच दबावाखाली गुजरातचा संघ अवघ्या 143 डावांमध्ये ढेपाळला आणि चेन्नईने स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवला.


पंड्याचा पत्ता कट?


चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या शुभम दुबेची फटकेबाजी पाहून अनेकांनी टी-20 वर्ल्डकपसाठी रोहित शर्माने नक्कीच हार्दिक पंड्याऐवजी शुभमनचा विचार करावा अशा अर्थाच्या अनेक पोस्ट मंगळवारी संध्याकाळपासूनच सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. यामध्ये अनेकांनी शुभमची खेळी पाहून हार्दिकचं टेन्शन वाढलं असेल, शुभम असताना पांड्याची गरज काय? अशा पोस्ट केल्या आहेत. तर दुसरीकडे मुंबईच्या संघातील नेतृत्वबदलानंतर मैदानात पहिल्याच सामन्यात आजी आणि माजी कर्णधारासंदर्भात घडलेल्या अनेक गोष्टींचा संदर्भ देत चाहत्यांनी आता शुभमची खेळी पाहून हार्दिकला टी-20 वर्ल्ड कपसाठी रोहितचे पाय दाबावे लागणार अशी शक्यता व्यक्त करणारे मीम्सही शेअर केले आहेत.


नक्की वाचा >> पंड्या धोनीची स्टाइल मारण्याचा प्रयत्न करतो का? शमी संतापून म्हणाला, 'तुम्ही धोनीची तुलना..'


पाहूयात काही व्हायरल पोस्ट...


1) शुभमची खेळी पाहिल्यावर पंड्या



2) तुम्हाला कोणाला पहायला आवडेल?



3) आता हार्दिकला हे करावं लागेल



4) पंड्याची जागा घेणारा सापडला



5) पंड्याऐवजी शुभमला निवड रोहित



तरुण खेळाडूंना सुवर्णसंधी


आयपीएलनंतर जून महिन्यापासून टी-20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होत असून या स्पर्धेमध्ये संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावरच टी-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी बीसीसीआयची निवड समिती खेळाडू निवडेल असं सांगितलं जात आहे. त्यामुळेच तरुण खेळाडूंसाठी आयपीएल ही सुवर्णसंधी मानली जात असून अनेक दिग्गज खेळाडूंना कामगिरीच्या जोरावर डच्चू देत नवीन खेळाडूंना संधी दिली जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.