Ritika Sajdeh : मुंबई इंडियन्सने खरंच रोहित शर्माला दिला धोका? रितिका म्हणते `खूप गोष्टी चुकल्या पण...`
Ritika Sajdeh On Mark Boucher Statement : रोहितला कॅप्टन्सीवरून का काढलं? यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्याच्या या मुलाखतीवर रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने कमेंट करत नाराजी व्यक्त केली आहे.
Rohit Sharma Wife : आयपीएल 2024 च्या लिलावापूर्वी कॅप्टन रोहित शर्माला (Rohit Sharma) नारळ देऊन हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार बनवण्यात आलं. रोहितला कॅप्टन्सीवरून डच्चू मिळाल्यानंतर मुंबई इंडियन्सचे फॅन्स नाराज झाल्याचं पहायला मिळालं होतं. अशातच आता मुंबई इंडियन्सचे हेड कोच मार्क बाउचर (Mark Boucher) यांनी रोहितला कॅप्टन्सीवरून का काढलं? यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्याच्या या मुलाखतीवर रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने (Ritika Sajdeh) कमेंट करत नाराजी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले होते Mark Boucher?
माझ्या मतानुसार हा निर्णय पूर्णपणे क्रिकेटशी संबंधीत निर्णय आहे. बाकी काहीही नाही... रोहित शर्माने आपल्या फलंदाजीचा आनंद घ्यावा अन् मुंबईला मोठ्या उंचीवर पोहोचवावं, यासाठी त्याच्याकडून कॅप्टन्सी काढण्यात आली, असं हेड कोच मार्क बाउचरने यांनी म्हटलं होतं. हार्दिक पांड्याला आम्ही संघात घेण्याचा असा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. काही वेळेस काही निर्णय घेताना आपल्याला भावना दूर ठेवाव्या लागतात. अनेक लोकांना याबद्दल माहिती देखील नव्हतं. त्यामुळे लोक भावनिक होतात, असं मत कोच मार्क बाउचरने मांडलंय.
रितिका काय म्हणाली?
मार्क बाउचर यांच्या मुलाखतीवर रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने कमेंट केली आहे. त्यावेळी तिने स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. So many Things Wrong with this म्हणजे 'यामध्ये खूप गोष्टी चुकीच्या झाल्या आहेत', असं रितिका म्हणते. तिची कमेंट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. सध्या रोहित शर्मा टेस्ट टीमची कॅप्टन्सीमध्ये विजय नोंदवत असताना रितिकाने अशी कमेंट केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
मुंबई इंडियन्सचा संघ
मुंबई इंडियन्स : आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, हार्दिक पांड्या (C), डेवाल्ड ब्रेविस, इशान किशन (WK), जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय सिंग, एन. तिलक वर्मा, नेहल वढेरा, पियुष चावला, रोहित शर्मा, रोमॅरियो शेफर्ड, शम्स मुलानी, सूर्यकुमार यादव , टीम डेव्हिड आणि विष्णू विनोद.
नवे खेळाडू : जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी आणि शिवालिक.