MS Dhoni Test retirement Reason : वयाच्या 42 व्या वर्षी महेंद्रसिंह धोनी आयपीएल खेळतोय. यंदाच्या आयपीएल हंगामात सर्वात वयस्कर खेळाडू म्हणून धोनीची (Mahendra Singh Dhoni) नोंद झालीये. 2004 मध्ये सुरू झालेलं महेंद्रसिंग धोनीचं आंतरराष्ट्रीय करियर आता हळूहळू समाप्त होत आहे. धोनी यंदाचा अखेरचा आयपीएल (IPL 2024) हंगाम खेळेल, अशी चर्चा होताना दिसत आहे. धोनीने ऋतुराजच्या खांद्यावर चेन्नईची जबाबदारी सोपवल्याने धोनी शेवटचा आयपीएल हंगाम खेळेल, असं मानलं जातंय. अशातच आता 10 वर्षांपूर्वी धोनीने कसोटी क्रिकेटला अलविदा केला होता. धोनीने निवृत्ती का घेतली होती? याचं उत्तर मिळालं नव्हतं. अशातच आता धोनीची पत्नी साक्षी (Sakshi Dhoni) हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत असून त्यात तिने धोनीच्या टेस्ट निवृत्तीचं कारण सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महेंद्रसिंग धोनीने 2014 मध्ये अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यावेळी टीम इंडिया ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर होती. बॉक्सिंग डे टेस्टनंतर धोनीने निवृत्ती घेतली अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. विकेटकिपिंगमुळे धोनीने निवृत्ती घेतल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, त्याचं खरं कारण कोणालाही माहित नव्हतं. धोनीने देखील यावर बोलणं टाळलं होतं. चेपॉकमध्ये कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जच्या आयपीएल सामन्यादरम्यान एका नेटकऱ्याने साक्षीची एक जुनी क्लिप शेअर केली होती. त्यामध्ये साक्षी धोनीच्या टेस्ट निवृत्तीवर बोलताना दिसत आहे.


व्हिडीओमध्ये काय म्हणाली साक्षी? 


जेव्हा तो कसोटी क्रिकेट सोडत होता, तेव्हा आम्हाला तो पद सोडणार असल्याचे संकेत मिळाले होते. मला सुद्धा आठवतंय की मी त्याला म्हणाले होते, 'तुसा मुल हवं असेल तर तुला किमान एका फॉरमॅटपासून दूर जावं लागेल, कारण तुला मुलासोबत खेळायला किंवा मजा करायला वेळ मिळणार नाही. लोक मला सांगतात की त्यांची पत्नी म्हणून मला खूप त्याग करावा लागला. मी म्हणतो की, हे काही नाही, हे सर्व फक्त प्रेम आहे. जेव्हा जिवाचा जन्म झाला तेव्हा हॉस्पिटलमध्ये सर्वजण सांगत होते की तुझा नवरा आला नाही. तेव्हा मी तिला सांगितलं की, त्याची प्राथमिकता क्रिकेट आहे आणि माझी प्राथमिकता त्याला आहे, असं साक्षी या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे. 



दरम्यान, हा व्हिडीओ कधीचा आहे? याची माहिती अद्याप समोर आली नाही. 2014 मध्ये धोनीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेत कोहलीच्या खांद्यावर जबाबदारी सोपवली होती. तर 2017 मध्ये धोनीने वनडे क्रिकेटच्या कॅप्टन्सीचा देखील राजीनामा दिला होता. त्यानंतर 2019 च्या वर्ल्ड कपनंतर धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. अशातच आता यंदाचा आयपीएल हंगाम धोनीसाठी अखेरचा असण्याची शक्यता आहे.