Mumbai Indians Playing XI Without Suryakumar Yadav : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा सतरावा हंगाम सुरु होण्यासाठी आता अवघ्या दोन दिवसांचा अवधी उरला आहे. आयपीएलचा (IPL 2024)पहिला सामना 22 मार्चला चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्यान (RCB) रंगणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पहिला सामना 24 मार्चला गुजरात टायटन्सविरुद्ध रंगणार आहे. पण त्याआधीच मुंबई संघाला मोठा धक्का बसला आहे. टी20 स्पेशलिस्ट आणि मुंबईचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. मंगळवारी झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये सूर्या फेल झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कशी असेल मुंबईची प्लेईंग इलेव्हन?
अशात सूर्यकुमार यादव पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही तर मुंबई इंडियन्सची प्लेईंग इलेव्हन कशी असणार याकडे मुंबईकर क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. सूर्यकुमार यादवऐवजी मुंबईच्या संघात नेहाल वढेरा किंवा विष्णू विनोद यापैकी एकाला संधी मिळू शकते. यात नेहाल वढेराला संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. नेहाल तळाला आक्रमक फलंदाजीबरोबरच गोलंदाजीही करु शकतो. 


रोहित शर्मा आणि विकेटकिपर फलंदाज ईशान किशन मुंबईच्या संघाची सुरुवात करतील. तर तिसऱ्या क्रमांकावर तिलक वर्मा फलंदाजीला उतरेल. चौथ्या क्रमांकावर कर्णधार हार्दिक पांड्या फलंदाजीला येऊ शकतो. गुजरात टायटन्स संघातून हार्दिक पांडयाने दोन हंगाम चौथ्या क्रमांकावरच फलंदाजी केली आहे. मुंबई संघातून सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. ही जागा आता हार्दिक पांड्याकडे असेल. 


पाचव्या क्रमांकावर नेहाल वढेरा आणि सहाव्या क्रमांकावर अफगाणिस्तानाच सुपरस्टार मोहम्मद नबीला संधी मिळू शकते. नबीच्या संघातील समावेशामुळे मुंबई इंडियन्सला मोठा आधार मिळाला आहे. यानंतर टिम डेव्हिडची अॅक्शन पाहायला मिळेल. तर अनुभवी पियुष चावला मुंबईचा प्रमुख फिरकी गोलंदाज असेल. जसप्रीत बुमराह आणि आकाश मधवाल वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील. लसिथ मलिंगाचा क्लोन समजला जाणारा नुवान तुषारा मुंबईचं प्रमुख आकर्षण असणार आहे. 


मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेईंग इलेव्हन 
ईशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नेहाल वढेरा, टिम डेविड, मोहम्मद नबी, पीयुष चावला, आकाश मधवाल, नुवान तुषारा और जसप्रीत बुमराह.


मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ
हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, एन. तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पियुष चावला, आकाश मधवाल, ल्यूक वुड, रोमॅरियो शेफर्ड, जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा.


मुंबई इंडियन्सचं वेळापत्रक
मु्ंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स - 24 मार्च
मु्ंबई इंडियन्स वि. सनराजयर्स हैदराबाद - 27 मार्च
मु्ंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स - 1 एप्रिल
मु्ंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स - 7 एप्रिल