IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सच्या ड्रेसिंग रुममध्ये चोरी, डेव्हिड वॉर्नरच्या हुशारीने असा सापडला चोर, पाहा Video
Delhi Capitals Dressing Room Video : दिल्ली कॅपिटल्सच्या ड्रेसिंग रुममध्ये चोरट्याने धुडघूस घातला असताना डेव्हिड वॉर्नरने (David Warner) कसं चोराला पकडलं? याचा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.
Thief Entered The Delhi Capitals Team : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स (RCB vs DC) च्या अडचणी वाढल्या आहेत. आरसीबीने तब्बल 47 धावांनी दिल्लीचा पराभव केला. त्यामुळे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा दिल्लीचा मार्ग अत्यंत खडतर झाला आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघाने 13 पैकी 6 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता दिल्लीकडे केवळ 12 गुण खात्यात आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना मोठ्या विजयाची गरज आहे. मंगळवारी, 14 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स (LSG vs DC) विरुद्धचा सामना करा किंवा मरो असा असेल. मात्र, अशातच आता दिल्ली कॅपिटल्सच्या ड्रेसिंग रुममधील एक व्हिडीओ (Delhi Capitals Dressing Room) समोर आला आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या ट्विटर हॅडलवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. ज्यामध्ये दिसतंय की, दिल्लीच्या ड्रेसिंग रुममध्ये (DC Dressing Room) एक चोर घुसला. चोराने खेळाडूंचे मोबाईल लंपास केले. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने असं काही केलं की, चोर आपोआप समोर आला. ड्रेसिंग रुममध्ये नेमकं काय झालं? त्याचा मजेशीर व्हिडीओ सध्या तुफान शेअर केला जातोय.
सलामीवीर डेव्हिड वॉर्नर त्याच्या साथीदारासह ड्रेसिंग रुममध्ये बसला होता. त्यावेळी त्यांनी त्याचे फोन मांडीवर ठेवले होते. त्याचवेळी दिल्लीच्या जर्सीमध्ये एक चोर ड्रेसिंग रुममध्ये शिरला अन् दोघांचे फोन लंपास केले. जेव्हा आपला फोन गायब असल्याचं समजलं तेव्हा दोघांनी संपूर्ण ड्रेसिंग रुम शोधून काढली पण फोन सापडला नाही. त्यावेळी वॉर्नरने एक कलृप्ती आमलात आणली अन् चोरांना पकडलं. टेबलाखाली लपलेला चोर वॉर्नरने डोकं लावून शोधून काढला. 'जीने मेरा दिल लुटिया' असं गाणं म्हणत वॉर्नरने सुर दिला. त्यावर चोर टेबलाखालून बाहेर आला अन् 'ओ हो'... म्हणत वॉर्नरला साद दिली.
पाहा Video
दिल्ली कॅपिटल्सचा संघ - ऋषभ पंत (C), जेक फ्रेझर-मॅकगुर्क, अभिषेक पोरेल (WK), शाई होप, कुमार कुशाग्रा, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रसिक दार सलाम, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद, गुलबदिन नायब, प्रवीण दुबे, सुमित कुमार, ललित यादव, पृथ्वी शॉ, लिझाद विल्यम्स, डेव्हिड वॉर्नर, रिकी भुई, झ्ये रिचर्डसन, एनरिक नॉर्टजे, यश धुल, विकी ओस्तवाल, स्वस्तिक चिकारा.