रैनाचा आफ्रिदीला पुणेरी टोमणा! Live मॅचमध्ये टाळ्या देत खळखळून हसले कॉमेंटेटर्स; पाहा Video
IPL 2024 Viral Video: सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कोलकाता विरुद्ध सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यादरम्यानचा असून अनेकांनी यावर मजेदार प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत.
IPL 2022 Viral Video: भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने पाकिस्तानाचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीसंदर्भात खोचक प्रतिक्रिया नोंदवली आहे. आयपीएलम 2024 मधील क्वालिफायर-1 चा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाददरम्यान खेळवण्यात आला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला हा सामना कोलकात्याच्या संघाने जिंकला. या सामन्यादरम्यानच्या चर्चेमध्ये समालोचक आकाश चोप्राने सुरेश रैनाला तू निवृत्ती मागे घेण्याची काही शक्यता आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर सुरेश रैनाने मजेदार प्रतिक्रिया नोंदवताना अगदी पुणेकर स्टाइल टोमणा मारला. त्याचं उत्तर ऐकून कॉमेंट्री बॉसमध्ये एकच हशा पिकला.
आफ्रिदीने केलेली निवृत्तीची हॅटट्रीक
पाकिस्तानचा माजी कर्णधार राहिलेल्या शाहीद आफ्रिदीने त्याच्या संघातील इतर अन्य सहकाऱ्यांप्रमाणेच अनेकदा निवृत्तीसंदर्भातील निर्णय जाहीर केले. अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ये-जा करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये शाहीद आफ्रिदीचा समावेश होतो. त्याने सर्वात आधी मे 2011 मध्ये पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाविरुद्ध भूमिका घेत आपला निषेध नोंदवण्यासाठी निवृत्ती जाहीर केली. त्याच वर्षी त्याने ही निवृत्ती मागे घेतली. ऑक्टोबर महिन्यामध्ये पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचं नेतृत्व बदलल्यानंतर आफ्रिदी पुन्हा अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रीय झाला. त्यानंतर 2017 साली आफ्रिदीने पुन्हा निवृत्ती जाहीर केली. मात्र तो परत 2018 मध्ये अंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू लागला. त्यानंतर त्याने त्याच वर्षी मे महिन्यात तिसऱ्यांदा निवृत्ती जाहीर केली.
रैनाने किमान शब्दात केला अपमान
क्वालिफायर-1 च्या सामन्यामध्ये समालोचन करताना सुरेश रैना आणि आकाश चोप्रा गप्पा मारत होते. कॉमेन्ट्री बॉक्समधून सामन्यादरम्यान चर्चा करताना आकाश चोप्राने सुरेश रैनाला निवृत्ती मागे घेण्याचा तुझा काही विचार आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर सुरेश रैनाने किमान शब्दात शाहीद आफ्रिदीचा कमाल अपमान केला. चोप्राच्या प्रश्नाला रिप्लाय देताना सुरेश रैनाने, 'नही भाई! सुरेश रैना हू, शाहीद आफ्रिदी नही,' असं म्हटलं. हे उत्तर ऐकून दोघे कॉमेंट्री बॉसमध्ये अगदी एकमेकांना टाळ्या देत जोरजोरात हसू लागले.
रैनाची निवृत्ती
सुरेश रैनाने ऑगस्ट 2020 मध्ये अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. कर्णधार महेंद्र सिंह धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर काही तासांमध्ये त्याने आपला हा निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता. त्याने 18 कसोटी, 226 एकदिवसीय क्रिकेट सामने आणि 78 टी-20 सामन्यामध्ये बारताचं प्रतिनिधित्व केलं. ते 2018 मध्ये आपला शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. त्याने 2011 च्या वर्ल्डकप स्पर्धेमधील उपउपांत्य पेरीत आणि उपांत्य फेरीत दमदार कामगिरी करत भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचा हातभार लावला होता.
आयपीएलमधील रैनाची कामगिरी
रैनाने चेन्नई सुपर किंग्जच्या संघातून खेळताना संघाला चार जेतेपदं मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तो आयपीएलमध्ये 205 सामने खेळला आहे. तो 2008 ते 2021 दरम्यान आयपीएलमध्ये सक्रीय होता. त्याने 2021 मध्ये आयपीएलमधूनही निवृत्ती घेतली.