Indian Premier League 2024 : टीम इंडियाला मिळालेल्या महान गोलंदाजांपैकी एक म्हणजे जहीर खान. 2011 मध्ये टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा झहीर खान (Zaheer Khan) आता निवृत्तीनंतर आयपीएलमध्ये समालोचन करतोय. एकदिवसीय क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत झहीर खान अजूनही चौथ्या स्थानी कायम आहे. मात्र, तुम्हाला माहिती का? झहीर खान टीम इंडियासाठी डेब्यू करण्याआधी एका देशासाठी खेळला आहे. आयपीएलमध्ये समालोचन करताना न्यूझीलंडचे माजी ऑलराऊंडर खेळाडू आणि झहीर खानचे सहकारी स्कॉट स्टायरिस (Scott styris) यांनी मोठा खुलासा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू स्कॉट स्टायरिसने या जिओ सिनेमावर झहीर खानची पोलखोल केली. सुरूवातीला झहीरला काही आठवलं नाही पण स्कॉट स्टायरिसने घटनाक्रम सांगितल्यावर जहीरने देखील प्रांजल कबुली दिली. स्कॉट स्टायरिसने असं काही सांगितलं की, तुम्ही देखील ऐकून शॉक व्हाल. जिओ सिनेमाच्या शोमध्ये बोलताना स्टायरिसने झहीरला आठवण करून दिली की, तू टीम इंडियामध्ये डेब्यू करण्याआधी ऑस्ट्रेलियाकडून खेळला आहेस. त्यावेळी इन्सायडर्समध्ये बोलताना स्टायरिसने झहीरला विचारलं की, तुला माहिती का तू कोणत्या देशासाठी पहिला सामना खेळलास? आणि कोणाविरुद्ध? त्यावेळी झहीर खान बुचकाळ्यात पडला.


होय, मी तुझ्याविरुद्ध खेळलो होतो. झहीर टीम इंडियामध्ये डेब्यू करण्याआधी ऑस्ट्रेलियाकडून खेळला. तो ऑस्ट्रेलियाकडून न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. हा माझा अपमान आहे की, मी ऑस्ट्रेलियामध्ये जन्म घेऊन सुद्धा ऑस्ट्रेलियासाठी खेळू शकलो नाही, पण तू खेळलास, असं स्कॉट स्टायरिसने म्हटलं आहे. ही चर्चा सुरू असताना ब्रेट ली देखील तिथंच बसला होता. त्यावेळी त्याला देखील त्याच्या कानावर विश्वास बसला नाही. 



दरम्यान, झहीर खानने संपूर्ण घटना सांगितली, अच्छा... त्यावेळी अकादमी फक्त अॅडलेटमध्ये असायची. मी मायकल क्लार्क माझ्यासोबत अकादमीमध्ये होता. त्यावेळी मी मायकल क्लार्कसोबत ऑस्ट्रेलियाकडून खेळायचो, जो सराव सामना असायचा, असंही झहीरने यावेळी सांगितलं. झहीरने ऑस्ट्रेलियाकडून न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता.