IPL Mega Auction: आयपीएल 2024 (IPL 2024) मध्ये मैदानातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले होते. गौतम गंभीर (Gautam Gambhir)-विराट कोहलीमधील (Virat Kohli) वाद असो किंवा मग विराटने सौरव गांगुलीकडे रागाने टाकलेली नजर असो. असाच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता, ज्यामध्ये पराभवानंतर लखनऊ सुपरजायंट्स संघाचे मालक संजीव गोयंका (LSG Owner Sanjeev Goenka) यांनी मैदानातच कर्णधार के एल राहुलला (KL Rahul) सुनावलं होतं. आयपीएलच्या नव्या हंगामात लखनऊ आणि के एल राहुलने आता वेगळं होण्याचा निर्णय घेता आहे. यामागे जी कारणं आहेत त्यात या व्हिडीओचाही समावेश असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान जवळपास सहा महिन्यांनी के एल राहुलने यावर मौन सोडलं असून भाष्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लखनऊ संघाचा डगआउटमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर संजीव गोयंका यांनी सार्वजनिकपणे के एल राहुलला फटकारलं होतं. यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये एकच खळबळ उडाली होती. सोशल मीडियावर अनेकांनी यावर संताप व्यक्त करत संजीव गोयंका यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. आपल्यावर टीका होऊ लागल्यानंतर प्रकरण शांत करण्यासाठी संजीव गोयंका यांनी के एल राहुलला आपल्या घरी डिनरसाठी बोलावलं होतं. पण लखनऊ संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये सर्व काही आलबेल नाही ही कुजबूज कायम होती. आता जेव्हा लखनऊ संघाने के एल राहुलला रिलीज केलं आहे तेव्हा आता पुन्हा ती चर्चा सुरु झाली आहे. 


दोन वेळचं जेवण मिळेना, मुंबई सोडली, सेल्समन म्हणून काम केलं अन् आज...; यशस्वीच्या भावाची ही अवस्था का झाली?


 


दरम्यान के एल राहुलने त्या घटनेवर पहिल्यांदा भाष्य करताना त्याचा भाग होणं फार काही चांगली बाब नव्हती आणि सर्व सहकाऱी व्यक्त होताना धक्का बसल्याचं जाणवत होतं अशी माहिती दिली आहे. 


"एक संघ म्हणून आम्हा सर्वांनाच धक्का बसला होता. याचं कारण आम्ही स्पर्धेत अशा ठिकाणी होतो जिथे प्रत्येक सामना महत्त्वाचा होता. आम्हाला काही करुन जिंकायचं होतं. बहुतेक 5 पैकी 3 किंवा अखेरच्या 4 पैकी 2 सामने जिंकायचे होते. जेव्हा ते झालं तेव्हा आम्हा सर्वांसाठी तो खूप मोठा धक्का होता," असं के एल राहुल म्हणाला आहे.


"मैदानात सामन्यानंतर जे काही झालं त्याचा भाग होणं फार काही चांगली बाब नव्हती. आपल्यासह क्रिकेटच्या मैदानावर असं काही व्हावं अशी कोणत्याही क्रिकेटरची इच्छा नसते. मला वाटतं की त्याचा संपूर्ण संघावर परिणाम झाला. आम्हाला अजूनही संधी होती. आम्ही एक संघ म्हणून चर्चा केली आणि आणि सर्व काही बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला, आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न केले, परंतु दुर्दैवाने, ते अपेक्षेप्रमाणे नव्हते. आम्ही अपेक्षेप्रमाणे प्लेऑफ किंवा हंगाम जिंकू शकलो नाही,” असं के एल राहुल म्हणाला. 


'मी खेळलेल्या अत्यंत वाईट सामन्यांपैकी एक'


राहुलने हैदराबादविरुद्धच्या त्या सामन्याची आठवण करून दिली, जिथे लखनऊने 165 धावा केल्या. या सामन्यात त्याने 33 चेंडूत 29 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ट्रॅव्हिस हेड (30 चेंडूत 89) आणि अभिषेक (28 चेंडूत 75) यांनी दमदार खेळी केली. सनरायझर्सने केवळ 9.4 षटकात सामना जिंकला होता. 


त्या सामन्याबद्दल बोलताना राहुल म्हणाला, "मला खरंच माहित नाही की बाहेर किती खेळी केली गेली होती, पण मला फक्त आठवते की एक खेळाडू म्हणून मी ज्या सर्वात वाईट सामन्यांचा भाग होतो त्यापैकी हा एक होता. सनरायजर्सने ज्याप्रकारे फलंदाजी केली ते पाहून आम्हाला धक्का बसला होता. नंतर आम्ही टीव्हीवर पाहिलं तेव्हा ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा किती प्रभावी किंवा धोकादायक होते हे पाहिलं".


"पण जवळून पाहिलं तेव्हा काही केलं तरी चेंडू रेषेच्या पलीकडे जात होता. आमच्या गोलंदाजांनी टाकलेला कोणताही चेंडू बॅटच्या मधोमध लागायचा आणि गर्दीत जायचा. नऊ षटकात 160, 170 धावा करणं हे अतीच आहे. हे काय झालंय समजण्यासाठी आम्हाला स्वत:ला चिमटा काढावा लागला," असंही तो म्हणाला.