IPL 2025 Mega Auction : जगातील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध क्रिकेट लीगपैकी एक असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2025) 18 व्या सीजनसाठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी मेगा ऑक्शन पार पडणार आहे. आयपीएल 2025 साठी होणार हे मेगा ऑक्शन सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात होतं आहे. यंदाच्या ऑक्शनमध्ये 577 खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे. आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये सर्वात पहिली बोली स्टार गोलंदाज अर्शदीप सिंहवर (Arshdeep Singh)  लावण्यात आली.  2 कोटी बेस प्राईज असलेल्या अर्शदीप सिंहला पंजाब किंग्सने 18 कोटींना विकत घेतलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्शदीपला खरेदी करण्यासाठी भिडले संघ : 


अर्शदीप सिंह आयपीएल ऑक्शनमध्ये आला तेव्हा त्याला खरेदी करण्यासाठी जवळपास सर्वच संघांनी बोली लावली. यात सुरुवातीला चेन्नई सुपरकिंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सने त्याला खरेदी करण्यासाठी रस दाखवला. त्यानंतर सनरायजर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कोलकाता नाईट रायडर्स इत्यादींनी  बोली लावली. मात्र अखेर अर्शदीप सिंहसाठी पंजाब किंग्सने RTM कार्ड वापरले आणि अर्शदीपला 18 कोटींना विकत घेतले. अर्शदीप सिंह हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा भारतीय गोलंदाज ठरला आहे.