MS Dhoni on IPL 2025: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) आगामी आयपीएल (IPL 2025) स्पर्धेत खेळणार की नाही? याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. धोनीच्या भवितव्याबाबत वेगवेगळे तर्क आणि अंदाज लावले जात असतानाच त्यान यावर मोठं विधान केलं आहे. धोनीने आपल्या भवितव्याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. गोव्यातील एका कार्यक्रमात त्याने आयलीएमधील भविष्यावर भाष्य केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

43 वर्षीय धोनीने जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत पुढची काही वर्षं क्रिकेट खेळण्यासाठी जास्तीत जास्त फिट राहण्याचा प्रयत्न असेल असं सांगत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. धोनीच्या वक्तव्यानुसार त्याचा चेन्नईकडून फक्त 2025 मध्ये खेळण्याचा नव्हे तर मेगा लिलावातील तिन्ही वर्षं खेळण्याचा विचार आहे. 


"माझी क्रिकेटमधील जी काही शेवटची वर्षं शिल्लक आहेत त्यांचा मला आनंद घ्यायचा आहे," असं धोनीने ब्रँड ॲम्बेसेडर असलेल्या सॉफ्टवेअर ब्रँड रिगीच्या प्रमोशन कार्यक्रमता म्हटलं. पुढे तो म्हणाला की, "जेव्हा तुम्ही क्रिकेट एका व्यावसायिक खेळाप्रमाणे खेळता तेव्हा त्या खेळाचा आनंद घेणं कठीण होतं. तेच मला करायचं आहे. हे फार सोपं नाही. तुमच्या भावना सतत येत असतात, कमिटमेंट असतात. मला पुढील काही वर्षं खेळाचा आनंद घ्यायचा आहे".


धोनीच्या पुढील विधानांनी आयपीएल खेळणं जवळपास निश्चित असल्याचं स्पष्ट केलं आहे. "मी गेल्या 9 महिन्यांपासून स्वत:ला फिट ठेवलं आहे, जेणेकरुन मी अडीच महिने आयपीएल खेळू शकेन. तुम्ही यासाठी प्लॅन करण्याची गरज असते, सोबतच थोडी मजाही घ्यायची असते," असं धोनी म्हणाला.


धोनीने आयपीएल 2024 मध्ये ऋतुराज गायकवाडकडे नेतृत्व सोपवलं. धोनीने पाच वेळा आयपीएल जिंकलं असून स्पर्धेतील मोठं नाव आहे. धोनी भारतीय संघात खेळून पाच वर्षं झाली असून केवळ 4 कोटींच्या किमतीत चेन्नईद्वारे अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवता येईल.