मुंबई : आयपीएल २०१८चा लिलाव पूर्ण झाला आहे. या लिलावात राहुल तेवतिया हा एक असा अनक्लॅप्ड खेळाडू ठरला ज्याच्यावर बोली लावण्यात स्पर्धा लागली होती.


अवघ्या मिनिटांत लाखाहून कोटींच्या घरात उडी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२४ वर्षीय राहुल तेवतिया हा एक लेग स्पिनर असून त्याची बेस प्राईस केवळ दहा लाख रुपये होती. मात्र, अवघ्या काही मिनिटांतच त्याची किंमत २.५ कोटींच्या घरात पोहोचली.


राहुलला टीममध्ये घेण्यासाठी चढाओढ


लिलावात उपस्थित अनेक खेरदीदारांनी राहुल तेवतियासाठी बोली लावली. दिल्ली डेअरडेविल्स, किंग्स इलेव्हन पंजाब आणि सनरायजर्स हैदराबाद या टीम्सने राहुलला आपल्या टीममध्ये घेण्यासाठी बोली लावली.


राहुल तेवतियाला 'या' टीमने केलं खरेदी


पण, शेवटी दिल्ली डेअरडेविल्सच्या टीमने राहुल तेवतिया याला आपल्या टीममध्ये घेतलं. राहुलला दिल्लीच्या टीमने तीन कोटी रुपयांत खरेदी केलं.


तरुणांना आयपीएल हे एक चांगलं प्लॅटफॉर्म


तरुणांना क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी गेल्या काही वर्षांत आयपीएल हे एक चांगलं प्लॅटफॉर्म तयार झालं आहे. रिकी पाँटिंग कोच असलेल्या दिल्लीच्या टीममध्ये निवड झाल्याने राहुल तेवतिया खूपच आनंदी आहे. राहुल आपल्या काकांपासून प्रेरणा घेत क्रिकेटमध्ये आला होता.


राहुलने लहान वयातच क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. त्याने २०१३ साली हरियाणा विरुद्ध कर्नाटक यांच्यात झालेल्या मॅचमध्ये फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. या मॅचमध्ये राहुलने खेळलेली इनिंग सर्वांनीच पाहिली. मात्र, टी-२० मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबकडून पदार्पण केल्यानंतर त्याला एक वेगळी ओळख मिळाली. 


सर्वात आधी राजस्थान रॉयल्सने केलं खरेदी


राहुलला २०१४ साली राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल खेळण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्याला २०-२ लाख रुपयांत खरेदी केलं होतं. त्याचं प्रदर्शन पाहून २०१५ मध्ये पुन्हा राजस्थानच्या टीमने आपल्या टीममध्ये घेतलं. त्यावेळी राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन शेन वॉर्ननेही राहुलचं कौतुक केलं होतं. 


२०१६ मध्ये काही कारणास्तव राहुल आयपीएल खेळू शकला नाही. त्यानंतर २०१७मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबच्या टीमकडून राहुलला खेळण्याची संधी मिळाली.


राहुलने आतापर्यंत सहा फर्स्ट क्लास आणि सहा लिस्ट ए मॅचेस खेळल्या आहेत. नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये राहुल तेवतियाने तीन मॅचेस खेळत १२ रन्सवर एक विकेट, १५ रन्सवर दुसरी विकेट आणि ३४ रन्सवर तिसरी विकेट घेतली.


११ मॅचेसनंतर मिळाली होती संधी 


गेल्यावर्षी पंजाबच्या टीमने २५ लाख रुपयांत खरेदी केलं होतं. मात्र, सुरुवातीच्या ११ मॅचेसमध्ये त्याला खेळण्याची संधीच मिळाली नाही. त्यानंतर १२व्या मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरोधात खेळण्याची राहुलला संधी मिळाली. 'करो या मरो' अशा एका मॅचमध्ये राहुलने गंभीर आणि उथप्पा यांची विकेट घेत चांगलं प्रदर्शन दाखवलं होतं. त्याने चार ओव्हर्समध्ये १८ रन्स देत २ विकेट्स घेतले तसेच त्याने ८ बॉल्समध्ये १५ रन्स केले होते.


आजोबांना वाटत होतं कुस्तीपटू बनावं


राहुल तेवतियाचे आजोबा करण सिंह तेवतिया एक कुस्तीपटू होते. तर काका धर्मवीर तेवतिया हे राष्ट्रीय हॉकीपटू होते. राहुलच्या काकांना त्याला हॉकीपटू बनवायचं होतं तर, आजोबांना कुस्तीपटू बनवायचं होतं.