मुंबई : यंदा आयपीएल 2018 चं पर्व रंगणार आहे. यामध्ये खेळाडूंची बोली लागते. त्यानुसार आज आयपीएलच्या खेळाडूंचा लिलाव सुरू झाला आहे. 


सर्वात महागडा खेळाडू बेन स्टोक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळुरुमध्ये सुरु असलेल्या आयपीएल लिलावात आतापर्यंत सर्वात महागडा खेळाडू बेन स्टोक ठरला आहे.


दोन वर्ष बंदी असलेला स्टोक पुन्हा क्रिकेट खेळणार आहे. राजस्थान रॉयल्सच्या टीमने बेन स्टोक्सवर बोली लावली. 12 कोटी 50 लाखांना त्याला खरेदी केलं आहे. बेन स्टोक्सडी बेस प्राईस- 2 कोटी होती. बेन स्टोक्सला इतकी किंमत मिळाल्याने सगळेच हैराण आहेत.  


आयपीएलच्या बोलीनंतर सोशल मीडीयामध्ये जोक्स शेअर करायला सुरूवात झाली आहे.  


 



 



 



 मॅक्क्युलमला आरसीबीकडे  


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची टीम खूपच मजबूत दिसत आहे. विराट कोहली या टीमचा कर्णधार आहे. विराट शिवाय या टीममध्ये जगातील आणखी एक सर्वोत्कृष्ट खेळाडू एबी डिविलियर्स देखील आहे. पण या टीममध्ये आता आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. ते म्हणजे मॅक्क्युलम. मॅक्क्युलमला आरसीबीने 3.6 कोटींना विकत घेतलं आहे.


मॅक्क्युलम याआधी गुजरात लायन्स मधून खेळत होता. न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि विकेटकीपर मॅक्क्युलम हा धडाकेबाज क्रिकेटर्सच्या यादीत येतो. 


चेन्नईला पूर्वीच महेंद्र सिंह धोनी, सुरैश रैना आणि रविंद्र जडेजा या तीन खेळाडूंना परत पाठवले आहे. अशात लिलावादरम्यान विदेशी खेळाडूंवर आरटीएमचा प्रयोग करू शकेल. कुंबळेने सांगितले की, अश्विन आणि जडेजा ही जोडी यावर्षीही एकत्र राहावी, यासाठी चेन्नई प्रयत्न करेल. मात्र यादरम्यान असे होणे कठीण वाटत आहे.