IPL 2018 : या खेळाडूंवर साऱ्यांच्या नजरा, यांच्यावर होणार धनवर्षा
आयपीएल २०१८ मधील खेळाडूंच्या ऑक्शनला अगदी काही दिवस बाकी आहेत.
मुंबई : आयपीएल २०१८ मधील खेळाडूंच्या ऑक्शनला अगदी काही दिवस बाकी आहेत.
१ हजाराहून अधिक खेळाडूंनी यामध्ये नोंदणी केली होती. मात्र बीसीसीआयने छाटणी करत फक्त ५७८ खेळाडू निवडले आहेत. खेळाडूंचे प्रोफाईल चेक करून आठ वर्गवारी करण्यात आली आहे. आंतरराष्ट्री स्लॅबसाठी दोन करोड रुपये ते ५० लाख रुपयांपर्यंत आहे. तर अनकॅप खेळाडूंचे आधारमूल्य हे ४० लाख रुपये, ३० लाख आणि २० लाख रुपये आहे. पाहूया आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंची किंमत
रविचंद्र अश्विन : अश्विनला जगातील सर्वात हुशार स्पिनर ओळखला जातो. आयपीएलमध्ये ६.५५ इकोनॉमीवर १०० विकेट घेतल्या आहेत. अश्विन कोणत्याही टीमसाठी महागडा खेळाडू असणार आहे. महेंद्र सिंह धोनीने काही दिवसांपूर्वीच सांगितले होते की, अश्विनला पुन्हा घेऊन येण्याचा प्रयत्न टीम नक्की करणार. मात्र त्यासाठी आरटीएम कार्डाचा वापर करणार नाही. त्यामुळे तो आता चेन्नई सुपरकिंग्समध्ये सहभागी होईल असं वाटत नाही.
बेन स्टोक्स : स्टोक्स ला जेव्हा पुण्याने १४.५ करोडला आपल्या टीममध्ये घेतलं तेव्हा तो सर्वात महाग विकला गेलेला परदेशी खेळाडू होता. ही किंमत खरी असल्याचं सिद्ध करून स्टोक्स गेल्या टूर्नामेंटमध्ये प्लेअर ऑफ द टूर्नामेंट राहिला होता. गेल्या टूर्नामेंटमध्ये त्याने १२ विकेट घेऊन ३१.६० च्या रन रेटने १४३ स्ट्राइक रेटने रन केले होते. त्यामुळे २०१८ मध्ये पुन्हा एकदा स्टोक्स महाग खेळाडू असणार यात शंकाच नाही.
गौतम गंभीर : जरी गंभीर मैदानावर सर्वात तरूण खेळाडू नसला तरी तो सर्वात महागडा खेळाडू आहे. कारण आपल्या कॅप्टन पदामुळे तो सर्वात महागडा ठरला आहे. कोलकाता नाइट राइडर्सने गंभीरला रिटेन केलेलं नाही. त्यामुळे आता दिल्ली डेअरडेविल्स आणि किंग XI पंजाब हा संघ आपल्या टीममध्ये सहभागी करून घेण्यासाठी नक्की प्रयत्नशील असणार.
कुलदीप यादव : गेल्या काही वर्षांपासून कुलदीप यादव हा छोट्या फॉर्मेटमधील क्रिकेटमध्ये सर्वाधिक चांगला बॉलर राहिलेला आहे. एवढंच काय तर त्याने अश्विन आणि जडेजाला टीममधून बाहेर ठेवलं आहे. लोकांना आश्चर्य या गोष्टीचं वाटत आलं आहे की, केकेआर संघाने त्यांना रिटेन केले नाही. मात्र दुसरा संघ यादवला नक्की घेऊ इच्छित असेल. मात्र केकेआर देखील आरटीएम कार्डचा वापर करून यादवला संघात घेण्याचा नक्की प्रयत्न करेल.
जोशा बटलर : इंग्लंडच्या या विकेटकीपर बॅट्समनला प्रत्येक जण आपल्या टीममध्ये घेऊ इच्छित आहे. टी २० मध्ये बटलर हा कायम आक्रामक फलंदाज राहिलेला आहे. त्याचा स्ट्राइक रेट हा १४४ इतका आहे. विकेटच्या मागे देखील त्याच प्रदर्शन शानदार आहे. हल्लीच ऑस्ट्रेलियाच्या तिसऱ्या वन डे मध्ये बटलरने शानदार शतक केले आहे. तो कायमच मुंबई इंडियन्ससाठी चांगल प्रदर्शन करत असतो.
मनीष पांडे : मनीष पांडे हा पहिला भारतीय आहे ज्याने आयपीएलमध्ये शतक केलं आहे. आयपीएल लीगमध्ये उत्तम प्रदर्शन करणारा हा खेळाडू आहे. २०१४ च्या फायनलमध्ये केकेआरला विजय मिळवून देणारा नायक ठरला आहे. भारताच्या वन डे आणि टी २० मध्ये आपली जागा प्रस्थापित केल्यानंतर टीम आता त्यांना घेण्यास उत्सुक असेल. त्यांची बेस प्राइस ही फक्त १ करोड रुपये आहे. यावर आशा आहे की आता पांडेसाठी मोठी बोली लागू शकते.
राशिद खान : अफगाणिस्तानचा युवा लेग स्पिनर राशिद खान हा जगातील चांगल्या स्पिनरपैकी एक असल्याचं मानलं जातं. जगभरातील प्रत्येक लीगमध्ये राशिद खेळला आहे. इकोनॉमी ५.८१ असून प्रत्येकवेळी राशिदने आपलं वेगळेपण स्पष्ट केलं आहे. गेल्यावर्षी आयपीएलमध्ये त्याचा परफॉर्मन्स नक्कीच त्याची किंमत वाढवण्यास मदत करेल. त्यामुळे बहुकेत सगळ्याच टीम त्याला विकत घेण्याचा प्रयत्न करेल.
रॉबिन उथप्पा : जरी कर्नाटकच्या या बॉलरला कुणी घेऊ इच्छित नसेल पण रोबिन उथप्पा केकेआरच्या विजयाचा महत्वाचा भाग आहे. केकेआरसाठी खेळताना त्याचा ३० टक्के होत आहे. आयपीएल ७ मध्ये सर्वाधिक रन करणारा हा खेळाडू आहे. त्याने १६५ च्या स्ट्राइक रेटमध्ये ३८८ धावा केल्या आहेत. तसेच तो चांगला विकेटकीपर देखील आहे. त्यामुळे या खेळाडूसाठी चांगली बोली लागू शकते.
कीरोन पोलार्ड : वेस्ट इंडीयाचा हा सर्वात फास्ट असा ऑल राऊंडर प्लेअर आहे. टी २० क्रिकेटमध्ये हा सर्वाधिक स्कोर करणारा हा तिसरा प्लेअर आहे. आक्रामक फलंदाजीबरोबर फास्ट गोलंदाजी करणारा हा प्लेअर आहे. पोलार्ड आतापर्यंत २४३ विकेट घेणारा खेळाडू आहे. पोलार्डला आजही कोणत्या परिचयाची गरज नाही. तो टीमला जिंकवण्यासाठी छक्का मारून गेम फिरवू शकतो. मुंबई इंडियन्स त्याला पुन्हा टीममध्ये सहभागी करून घेण्यासाठी राइट टू मॅच कार्डचा प्रयोग करू शकतात.
कोलिन मुनरो : मुनरोटी २० मध्ये तीन शतक लावणारा हा एकटा खेळाडू आहे. न्यूझीलँडच्या या धाकड फलंदाजाला टीममध्ये घेण्यासाठी प्रत्येक जण इच्छुक असतो. आणि हेच कारण आहे की मुनरोची बोली सर्वाधिक असणार आहे. आता मुनरो सर्वाधिक फॉर्ममध्ये आहे. २७ जानेवारीला याची बोली सर्वाधिक जाणार आहे.