बंगळुरु : आयपीएलमध्ये दररोज नवनवे रेकॉर्ड्स होत असल्याचं पहायला मिळतं. आयपीएलमध्ये प्रसिद्ध खेळाडूंची नेहमीच चर्चा होत असते. मात्र, आयपीएलच्या इतिहासात आता एका नव्या नावाची नोंद झाली आहे.


पहिला नेपाळी क्रिकेटर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेपाळचा तरूण खेळाडू संदीप लामिचाने याची IPLमध्ये निवड करण्यात आलं आहे. आयपीएलमध्ये सहभागी होणारा संदीप हा पहिला नेपाळी क्रिकेटर ठरला आहे.


वर्ल्डकपमध्ये जबरदस्त प्रदर्शन


१७ वर्षीय संदीपला दिल्ली डेअरडेव्हिल्सने २० लाख रूपयांची बोली लावत खरेदी केलं आहे. या लेग स्पिनरने २०१६मध्ये अंडर-१९ क्रिकेट वर्ल्डकपमध्ये जबरदस्त प्रदर्शन दाखवलं होतं. संदीपने ६ मॅचेसमध्ये १४ विकेट्स घेतले होते. त्यामुळे सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या बॉलर्सच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला होता.


आयपीएलमध्ये खेळण्याची संधी


अफगाणिस्ताननंतर आता आयपीएलमध्ये नेपाळी खेळाडूही खेळताना दिसणार आहेत. गेल्यावर्षी राशिद खान हा अफगाणिस्तानचा पहिला खेळाडू होता ज्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. 


मायकल क्लार्कने केलं कौतुक


ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन मायकल क्लार्क यानेही संदीपचं प्रदर्शन पाहून कौतुक केलं होतं. त्याचं प्रदर्शन पाहून क्लार्कने एनएसडब्ल्यूए प्रीमिअर क्रिकेटमध्ये आपल्या वेस्टर्न सबर्बसतर्फे खेळण्यासाठी संदीपची निवड केली होती.


सायंग्जामध्ये जन्मलेल्या संदीपचे वडील भारतीय रेल्वेत काम करत होते आणि ते दोन-तीन वर्ष भारतात राहीले आहेत. या दरम्यान सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड सारख्या खेळाडूंपासून संदीप प्रभावित झाला होता.