मुंबई : शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत आयपीएलच्या ११व्या सीजनसाठी लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली. या लिलाव प्रक्रियेत एक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून सर्वांनाच एक धक्का बसला आहे.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या या लिलावात कोट्यावधी रुपयांची बोली लागली. इंग्लंडचा बेन स्टोक्स मागील वर्षासारखा, या वर्षी देखील महागात विकला गेला. स्टोक्सला राजस्थान रॉयल्सच्या टीमने १२.५० कोटी रूपयांत खरेदी केलं. तर, भारताच्या जयदेव उनादकट याला राजस्थान रॉयल्सने ११.५० कोटी रूपयात खरेदी केलं.


KXIP च्या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट


पहिल्या दिवसाचा लिलाव संपल्यानंतर प्रीती झिंटा मालकीन असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओत वीरेंद्र सेहवाग आपले सहयोगी आशिष नेहरा आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यासोबत लिलावात संदर्भात चर्चा करत असल्याचं दिसत आहे.


हे पण पाहा: IPL Auction 2018: अखेर ख्रिस गेलला लॉटरी लागली


बंगळुरुत झालेल्या लिलाव प्रक्रियेत सेहवाग आपल्या किंग्स इलेव्हन पंजाबसोबत खेळाडूंना खरेदी करत होता. तर, आशिष नेहरा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि व्हीव्हीएस लक्ष्मण सनरायजर्स हैदराबादसाठी खेळाडूंना खरेदी करत होते.


सेहवागने केला खरेदीचा प्लान


लिलावाच्या पहिल्या दिवशी सेहवागच्या टीमने बॅट्समनला खरेदी करण्याकडे विशेष लक्ष दिलं. तर, दुसऱ्या दिवशी बॉलर्सवर फोकस करण्याचा प्लान बनवला.


व्हिडिओत म्हटलयं की...


किंग्स इलेव्हन पंजाबने जो व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये सेहवाग, नेहरा आणि लक्ष्मण हे चर्चा करत आहेत. सेहवाग म्हणतो की, "भावा उद्याच्या लिलावात माझी काळजी घ्या. आज तर आम्ही बॅट्समनला खरेदी केलं मात्र, उद्या मला चांगले बॉलर्स हवे आहेत. मी ज्यावेळी बोली लावेल त्यावेळी तुम्ही मध्येच बोली लावू नका".


हे पण पाहा: BCCIने चुकीने या क्रिकेटरच्या भावाला मिळाली होती टीममध्ये एन्ट्री, IPLमध्ये बनला करोडपती


सेहवागने केलेल्या या विनंतीवर लक्ष्मण आणि नेहरानेही मस्करी हा म्हटल्याचं पहायला मिळत आहे. व्हिडिओत तिघेही मजामस्ती करण्याच्या मूडमध्ये हे तिघेही दिसत आहेत. तुम्हीही पाहा हा व्हिडिओ



व्हिडिओत तिघेही मजामस्ती करण्याच्या मूडमध्ये हे तिघेही दिसत आहेत.