IPL Auction : या दिग्गजांच्या पदरी निराशा, कोणीच बोली लावली नाही
आयपीएलचा २०२० सालासाठीचा लिलाव गुरुवारी कोलकात्यात पार पडला.
कोलकाता : आयपीएलचा २०२० सालासाठीचा लिलाव गुरुवारी कोलकात्यात पार पडला. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्स हा यंदाच्या मोसमातला सगळ्यात महागडा खेळाडू ठरला. पॅट कमिन्सला कोलकात्याने १५.५० कोटी रुपयांना विकत घेतलं. पॅट कमिन्स हा आयपीएल इतिहासातला दुसरा सगळ्यात महाग खेळाडू आणि सगळ्यात महाग परदेशी खेळाडू ठरला. तर लेग स्पिनर पियुष चावला हा यंदाच्या मोसमातला सगळ्यात महागडा भारतीय खेळाडू बनला. पियुष चावलाला ६.७५ कोटी रुपयांना चेन्नईने विकत घेतलं.
यंदाच्या मोसमासाठी एकूण ६२ जणांचा लिलाव झाला. या लिलावात अनेक खेळाडू कोट्यधीश झाले, तर काही दिग्गजांच्या पदरी निराशा आली. लिलावामध्ये विक्री न झालेल्या खेळाडूंमध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे.
आयपीएलमध्ये विक्री न झालेले दिग्गज खेळाडू
मार्टिन गप्टील- न्यूझीलंड
एव्हिन लुईस- वेस्ट इंडिज
केसरिक विलियम्स- वेस्ट इंडिज
जेसन होल्डर- वेस्ट इंडिज
कार्लोस ब्रॅथवेट- वेस्ट इंडिज
बेन कटिंग- ऑस्ट्रेलिया
कॉलिन मुन्रो- न्यूझीलंड
कॉलिन डिग्रॅण्डहोम- न्यूझीलंड
मुस्तफिजुर रहमान- बांगलादेश
मुशफिकुर रहिम- बांगलादेश
शाय होप- वेस्ट इंडिज
युसुफ पठाण- भारत
चेतेश्वर पुजारा- भारत
हनुमा विहारी- भारत
टीम साऊदी- न्यूझीलंड
मार्क वूड- इंग्लंड