IPL Mega Auction 2022: बंगळुरुमध्ये सुरु असलेल्या आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या खेळाडूवर मोठी बोली लागली. स्पिन ऑलराउंडर लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone) साठी जोरदार स्पर्धा पाहायला मिळाली. त्याची मुळ किंमत ही फक्त 1 कोटी होती. पण त्याच्यासाठी 11.50 कोटींची बोली लागली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडच्या विस्फोटक खेळाडूसाठी कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्स, गुजरात टाइटंस आणि सनराइजर्स हैदराबादमध्ये टक्कर पाहायला मिळाली. शेवटी पंजाब किंग्सने त्याच्यावर सर्वात मोठी बोली लावत आपल्या संघात घेतलं. 


लियाम लिविंगस्टोन याआधी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत होता. लिविंगस्टोनच्या आधी बेन स्टोक्स आयपीएलमध्ये सर्वात महागडा इंग्लंडच्या खेळाडू ठरला होता. 


त्याआधी सनरायजर्स हैदराबादने दक्षिण आफ्रिकेचा मिडिल ऑर्डर बॅट्समन एडम मार्करम याला 2.60 कोटींना खरेदी केले होते. कोलकाता नाईट रायडर्सने अजिंक्य रहाणेला एक कोटीमध्ये खरेदी केले. गुजरात टाइटंसने डॉमिनिक ड्रेक्सला 1.10 कोटीमध्ये खरेदी केले. न्यूझीलंडचा ऑलराउंडर जेम्स नीशमवर कोणीही बोली नाही लावली. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू एरॉन फिंच आणि भारतीय खेळाडू सौरभ तिवारीवर देखील कोणीही बोली लावली नाही.


दिल्ली कॅपिटल्सने मंदीप सिंहला 1.10 कोटीमध्ये खरेदी केले. डेविड मलानवर कोणीही बोली लावली नाही. कोलकाता नाईट रायडर्सने अजिंक्य रहाणेला 1 कोटीमध्ये खरेदी केले. विजय शंकरला गुजरात टाइंटसने 1.40 लाखाला विकत घेतले.