मुंबई : भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे आता आयपीएलच्या येत्या सिझनमध्ये पंजाब किंग्जचा मुख्य प्रशिक्षक असणार नाही. फ्रँचायझीने त्याचा करार न वाढवण्याचा निर्णय घेतलाय. बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा, उद्योगपती मोहित बर्मन, नेस वाडिया, करण पॉल आणि किंग्जचे सीईओ सतीश मेनन यांच्यासह बोर्डाच्या इतर सदस्यांच्या बैठकीनंतर कुंबळेबाबत निर्णय घेण्यात आला. पंजाब आता नवीन प्रशिक्षकाच्या शोधात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईएसपीएन क्रिकइन्फोने एका अहवालात म्हटलंय की, "कुंबळेची 2020 सिजनपूर्वी पंजाब किंग्जचे मुख्य प्रशिक्षक आणि पुढील तीन सिझनसाठी प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती."


कुंबळेची प्रशिक्षक म्हणून कामगिरी


कुंबळेच्या टीमच्या तिन्ही सिझनमध्ये पंजाब किंग्ज आयपीएलच्या गुणतालिकेत तळाशी राहिली. 2020 आणि 2021 मध्ये पाचव्या क्रमांकावर आहे, जेव्हा लीगमध्ये आठ टीमचा समावेश होता. 2022 मध्ये, दहा टीम्सची लीग खेळली गेली आणि टीम सहाव्या क्रमांकावर होती.


अनिल कुंबळे कोच म्हणून 2020 साली पंजाब किंग्जच्या ताफ्यात आले. खास गोष्ट म्हणजे आयपीएलच्या 2020 मध्ये कुंबळेच्या सिझनमध्ये केवळ एकच भारतीय कोच होते. कुंबळे त्यापूर्वी रॉयल चॅलेंजर बंगळूरू आणि मुंबई इंडियन्सच्या टीमसोबत कंसल्टंट म्हणून काम पाहत होते. 


अनिल कुंबळेच्या कार्यकाळात पंजाब किंग्जने 42 सामन्यांमध्ये भाग घेतला ज्यात त्यांनी 18 सामने जिंकले. त्याचवेळी पंजाब किंग्जला 22 सामन्यांत पराभवाला सामोरं जावं लागलं आणि दोन सामने बरोबरीत राहिले.